Nagar News :जिल्ह्यात यंदा पावसाने सुरुवातीपासून चांगली स्थिती ठेवली. जिल्हाभरातील समाधानकारक पावसामुळे एखादा अपवाद वगळता बहुतांश धरणातही मुबलक पाणीसाठा झाला आहे.
जून ते ऑगस्ट या काळात आतापर्यंत सरासरीच्या ११७ टक्केपाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसांत शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांतील बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी त्याचा खरीप आणि रब्बी या दोन्हीही हंगामात फटका बसला.
उन्हाळ्यात जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत होते. यंदाच्या पावसाळ्यात मात्र सुरुवातीपासूनच स्थिती चांगली आहे. या आठवड्यातील तसेच मागील आठवड्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीने मूग, उडीद, कांदा व अन्य पिकांना फटका बसला असला तरी सातत्याने पाऊस सुरू असल्याने खरीपपिकांची स्थिती चांगली आहे. उत्तर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, पिंपळगाव खांड यांसह सर्वच धरणे भरली आहेत. उत्तर जिल्ह्यात घाटशीळ पारगाव वगळता बहुतांश धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे.
जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचा विचार केला सरासरीनुसार ५७० मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र आतापर्यंत नगर जिल्ह्यात ६७०.४ मिलिमीटर म्हणजे ११७.४ टक्केपाऊस झाला आहे. त्यात नगर तालुक्यात सरासरीच्या १८१.२ टक्के, पारनेर १९२.८ टक्के, श्रीगोंदा २३१.९ टक्के, कर्जत १९५.१ टक्के, जामखेड १६६.६ टक्के, शेवगाव १९० टक्के, पाथर्डी २१० टक्के, नेवासा १४०.५ टक्के, राहुरी १३४.७ टक्के, संगमनेर १६७.२ टक्के, अकोले १७९ टक्के, कोपरगाव १३२.७ टक्के, श्रीरामपूर ११२.५ टक्के, तर राहाता ११७ टक्केपाऊस झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
तीस मंडलांत सरासरीच्या दुप्पट पाऊस (Rain) जिल्ह्यात आतापर्यंत केडगाव, जेऊर, चिचोंडी, रुईछत्तीशी, पारनेर, सुपा, वाढेगव्हाण, टाकळी, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, चिंभळा, देवदैठण, कर्जत, राशीन, भांबोरा, मिरजगाव, शेवगाव, बोधेगाव, चापडगाव, माणिकदौंडी, करंजी, मिरी, आश्वी, पिंपरणे, साकिरवाडी, राजूर, शेंडी या मंडलांत सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. तर, कोळगाव मंडळात सरासरीच्या तिप्पट पाऊस झाला आहे. केवळ पाच मंडलांत सरासरीच्या कमी पाऊस आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.