Seed Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Indigenous Seed Conservation : देशी बियाण्यांच्या संवर्धनाची चळवळ उभारणे गरजेचे

Desi Seed : ग्योथम् इन्स्टिट्यूट आणि बीज संकलक आणि संवर्धक अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘बीज कथा’ या कार्यक्रमात डॉ. जोशी बोलत होत्या.

Team Agrowon

Pune News : कोरोनासारख्या आजाराबरोबरच, जागतिक तापमान वाढ आणि विविध देशांचे आपापसातील संघर्ष यांची आव्हाने जगापुढे आहेत. या आव्हानांमध्ये अन्नसुरक्षा आणि आहारातील सत्त्व सुरक्षेचे प्रश्‍न उभे राहणार असून, यासाठी कृषी जैवविविधता संवर्धन होणे गरजेचे आहे.

यामध्ये प्रामुख्याने देशी बियाण्यांचे महत्त्व अधिक असून, ही बियाणे संवर्धनाची चळवळ होणे गरजेचे आहे, असे मत बाएफच्या प्रकल्प संचालिका डॉ. राजश्री जोशी यांनी व्यक्त केले. ग्योथम् इन्स्टिट्यूट आणि बीज संकलक आणि संवर्धक अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘बीज कथा’ या कार्यक्रमात डॉ. जोशी बोलत होत्या.

या वेळी ग्योथम् संस्थेचे संचालक मारकुस बिशेल, बीजविषयक अभंग सादर करणाऱ्या गायिका श्रृती विश्‍वनाथ, डेक्कन कॉलेजचे प्रा. अभिजित दांडेकर, ‘भवताल’चे अभिजित घोरपडे, संगीता खरात, आरती किर्लोस्कर, अपर्णा वाटवे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. जोशी म्हणाल्या, की संकरीत वाण दिवसेंदिवस वाढत असून, देशी बियाणे नष्ट होत आहेत. बियाणे आणि वाण नष्ट होण्याची प्रक्रिया आता धोकादायक पातळीवर गेली असून, काही देशी वाण पाहणारे आणि त्याची चव चाखणारी आपली शेवटची पिढी आहे. भविष्यात विविध पर्यावरणीय आणि मानवी आरोग्याच्या समस्या उभ्या राहत असल्याचे आपण कोरोना संकटात अनुभवले आहे.

कोरोना नंतरच्या काळात मानवी आरोग्याच्या समस्या वाढत असून, भविष्यात अन्न सुरक्षेबरोबरच आहारातील सत्त्व सुरक्षेचे प्रश्‍न आणि समस्या उभ्या राहणार आहेत. यासाठी देशी बियाणे आणि त्याबद्दलचे ज्ञान पुढील पिढीपर्यंत प्रसारित करण्याची गरज आहे. यासाठी देशी वाण संवर्धन चळवळ उभी राहणे गरजेचे आहे.’’

या कार्यक्रमात गायिका श्रृती विश्‍वनाथ यांनी संत तुकाराम, संत जनाबाई, संत सावतामाळी यांच्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश,आसाम राज्यांतील संताच्या बियाण्यांबाबतच्या अभंगाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि बीजकथा उपक्रमांची माहिती अभिजित पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

Mathura Labhan Cattle Breed : मराठवाड्यातील देखणा गोवंश ः मथुरा लभाण

Humani Control: १५ दिवसांत हुमणी करा गायब; हुमणी नियंत्रणाचे सोपे ३ मार्ग !

SCROLL FOR NEXT