Environmental Conservation Seed Ball : बीज चेंडू मुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार

Team Agrowon

फळे, फुलांच्या बिया सहज उपलब्ध

उन्हाळ्यात विविध प्रकारची फळे, फुलांच्या बिया सहज उपलब्ध होतात. या बियांचा योग्य उपयोग केल्‍या परिसरात घनदाट वृक्षवल्‍ली बहण्यास नक्‍कीच मदत होते.

Environmental Conservation Seed Ball | Agrowon

मातीचे चेंडू

निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या, घरी आणलेल्या फळांच्या बिया संग्रहित करून त्‍यांचे मातीचे चेंडू बनवून सुकवले जातात.

Environmental Conservation Seed Ball | Agrowon

पावसाळ्यात बीज चेंडूची रुजवण

पावसाळा सुरू होताच हे बीज चेंडू माळरानात, डोंगरात फेकले जातात. त्‍या दरम्‍यान पोषक वातावरण असल्‍याने त्‍यांची रुजवात चांगली होते.

Environmental Conservation Seed Ball | Agrowon

उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग

ठाणे, कल्याण, रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा व खासगी शाळांचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

Environmental Conservation Seed Ball | Agrowon

विद्यार्थ्यांद्वारे विविध कामे

माती व बिया गोळा करणे, मातीचे चेंडू बनविणे, त्यात बी रोपण करणे अशी कामे विद्यार्थी घरी, समूहात करीत आहेत.उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या बिया वाळवून त्याची पाकिटे तयार केली आहेत.

Environmental Conservation Seed Ball | Agrowon

विद्यार्थ्यांच्या हस्ते बीज चेंडूंची उधळण

या बिया मातीत टाकून त्‍यांचे बीज चेंडू तयार केले आहेत. पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या हस्ते बीज चेंडूंची परिसरातील जंगलात, माळरानावर उधळण होणार आहे. तर काही ठिकाणी त्‍यांचे रोपण करण्यात येणार आहे.

Environmental Conservation Seed Ball | Agrowon

वृक्षारोपणाला हातभार

उपक्रमातून माळरानावर, नदी किनारी वृक्षारोपण करणे शक्य आहे. यातून मुलांना विविध प्रकारच्या बियांची ओळख होते, वृक्ष लागवडीचे महत्त्व कळते, वृक्षसंवर्धनाचा संस्कार अंगवळणी पडतात. त्‍यामुळे पालकही सहभागी झाले आहेत.

Environmental Conservation Seed Ball | Agrowon
Eknath Shinde | Agrowon
आणखी पाहा...