Women Voters In Assembly Election Agrowon
ॲग्रो विशेष

Women Voters In Assembly Election : राज्यातील ३८ मतदार संघात ठरणार महिलाच किंगमेकर; पुरूषांपेक्षा महिला मतदारांची सख्यां अधिक

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात २० तारखेला मतदान होणार असून आता फक्त १९ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आता अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार (ता.४) शेवटचा दिवस असेल. एकीकडे सलग सलग सुट्ट्या लागल्याने महायुतीसह महाविकास आगाडीतील नेत्यांना बंडखोरांशी चर्चा करण्यास वेळ मिळाला आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने मतदारांच्या वयोगटानुसार माहिती प्रसिद्ध केल्याने अनेक उमेदवारांचे काम सोपे झाले आहे. याचमाहितीवरून २८८ मतदारसंघापैकी ३८ ठिकाणी महिला मतदारांची संख्या पुरूषांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण मतदार ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ आहेत. यापैकी ५ कोटी २२ हजार ७३९ पुरूष आणि ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ६ हजार १०१ एवढी आहे.

तसेच नंदूरबार, भंडारा, गोंदिया आणि रत्नागिरी या चारही जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्याचेही समोर आले आहे. यापाठोपाठ कोकणापासून विदर्भापर्यंत अनेक जिल्ह्यांची वर्णी लागते.

३८ मतदारसंघ कोणते?

या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, कागल, कोल्हापूर उत्तर, शिरोळचा समावेश होतो. तसेच सांगली जिल्ह्यातील मिरज आणि पलूस कडेगांवसह तळ कोकणातील दापोली, रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी, राजापूर, कणकवली, कुडाळ, महाडचा आहे.

याचबरोबर नागपूरमधील नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर मतदारसंघ देखील येतात. तर शहादा, श्रीवर्धन, कसबा पेठ, अरमोडी, डहाणू, नंदूरबार, गोंदिया, साकोली, आमगाव, अर्जूनी मोरगाव, ब्रम्हपूरी, पालघर, माहिम, कर्जत, अलीबाग, अकोला पश्चिम, तिरोडा, भंडारा मतदार संघात देखील महिला मतदारांची संख्या पुरूष मतदारांपेक्षा अधिक आहे.

लाडकी बहिणी तारणार की?

यादरम्यान महायुतीतील अनेक नेत्यांनी राज्यातील लाडक्या बहिणी आपल्यालाच पुन्हा संधी देतील असे म्हटले आहे. तर काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने मविआचे सरकार आल्यास लाडक्या बहिणीचा हप्ता वाढवू, असे आश्वासन दिले आहे.

त्यातच नव्या आकडेवारीमुळे महायुतीसह मविआला महिला मतदारासह नवमतदारांवर विशेष लक्ष केंद्रीत करता येणार आहे. पण लाडक्या बहिणींसह नवमतदार कोणाला संधी देतात, हे आता प्रत्यक्ष निकालातून दिसेलच समोर येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marigold Flower Rate : लाल-पिवळ्या झेंडूचा भाव वधारला

Crop Damage Survey Issue : पीक नुकसानीचे सर्वेक्षण अद्याप सुरूच; शेतकऱ्यांना फटका

Post Monsoon Rain : मॉन्सूनोत्तर पावसाचा धुमाकूळ

Adulteration Issue : ‘अन्न, औषध’चा भेसळखोरांवर बडगा

Rabi Sowing : रब्बीच्या पेरण्यांची मंदगती

SCROLL FOR NEXT