Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सलग दोन दिवसांपासून पावसाची जिल्ह्यात ‘बरसात’

Rain News : लोहारा, तूळजापूर, परंडा, भूम, वाशी तालुक्यांत पावसाचा काहीसा जोर राहिला.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यात दीड आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने सलग दोन दिवस हजेरी लावली आहे. मंगळवारी (ता. १५) आणि बुधवारी (ता. १६) बहुतांश भागांत हलका, तर काही भागांत मध्यम पाऊस झाला आहे.

लोहारा, तूळजापूर, परंडा, भूम, वाशी तालुक्यांत पावसाचा काहीसा जोर राहिला. तर, धाराशिव, कळंब, उमरगा तालुक्यात हलका पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.

मंगळवारी आणि बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात अनुक्रमे सरासरी ५ आणि ९.५ मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्यातील बहुतांश भागात पडला. लोहारा तालुक्यातील जेवळी मंडलात सर्वाधिक ३३ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

तालुकानिहाय पाहिल्यास लोहाऱ्यात सरासरी २०.४, तुळजापुरात १२.८, परंड्यात ११.७, भूममध्ये ११.२, उमरग्यात ८.८, धाराशिव तालुक्यात २.७, कळंबमध्ये ५.८ तर वाशी तालुक्यात ११.५ मिलिमीटर पाऊस झाला.

तालुकानिहाय सर्वाधिक पावसाची १५ मंडले

तालुका मंडळ पाऊस (मिलिमध्ये)

लोहारा जेवळी ३३

तुळजापूर नळदूर्ग २४.३

भूम माणकेश्वर २१

उमरगा डाळिंब २०.५

परंडा आसू १९.३

लोहारा माकणी १८.३

परंडा जवळा १६.५

वाशी वाशी १६.३

भूम भूम १५

तुळजापूर सावरगाव १४.८

परंडा परंडा. १३.३

तुळजापूर सलगरा, तुळजापूर प्रत्येकी १२.८

तुळजापूर जळकोट १०.३

लोहारा लोहारा १०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: शेतीप्रश्नांवर पाडव्याला किसान सभेचे राज्यभर आंदोलन

Kharif Crop Loss: खरिपाची कसर रब्बीत भरून काढू!

Cotton Price: खानदेशात कापसाला फटका

Cotton Registration: कापूस विक्रीसाठी स्व-नोंदणी मुदत ३१ पर्यंत

Agriculture College: डॉ. देशमुख यांच्या जन्मगावी कृषी महाविद्यालयाला अखेर मंजुरी

SCROLL FOR NEXT