Tractor news Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

एप्रिल महिना जागतिक स्तरावर गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलने अधिक उष्ण असल्याचं कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस सांगितलं आहे. त्यामुळं मागील सलग अकरा महीने सर्वात उष्ण असल्याचं स्पष्ट झालं

Dhananjay Sanap

एप्रिल महिना सर्वाधिक उष्ण

एप्रिल महिना जागतिक स्तरावर गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलने अधिक उष्ण असल्याचं कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस सांगितलं आहे. त्यामुळं मागील सलग अकरा महीने सर्वात उष्ण असल्याचं स्पष्ट झालं. त्याचा फटका भारतातील शेती क्षेत्राला बसला. देशातील १५० मोठ्या धरणात एकूण क्षमतेच्या २८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. तर देशातील ४२ पैकी ३७ धरणांचा पाणीसाठा ४० टक्क्यांच्या खाली घसरला. समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातही वाढ झाली. एप्रिल महिन्यात समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान २१.०४ अंश सेल्सियस नोंदवलं गेलं. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने आणि अमेरिकेच्या नोआ संस्थेनं अल निनो २०२४ च्या जूनमध्ये न्यूट्रल स्थितीत येण्याची ८५ टक्के शक्यता वर्तवली. गेल्या वर्षी एल निनोचा परिणाम मॉन्सून हंगामावर झाला होता. त्यामुळं देशातील बहुतांश भागात पावसानं दडी मारली होती. त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला होता. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली.  

तीन ट्रॅक्टर बाजारात दाखल

सीमांत शेतकऱ्यांसाठी व्हिएसटी झेटोर प्रायव्हेट लिमिटेड, व्हिएसटी टील्लर ट्रॅक्टर्स लिमिटेड आणि एचटीसी इन्वेस्ट या कंपनीने संयुक्त तीन ट्रॅक्टर लॉंच केलंत. ४१ ते ५० एचपी रेंजमध्ये व्हिएसटी झेटॉर ४२११, व्हिएसटी झेटॉर ४५११ आणि व्हिएसटी झेटॉर ५०११ अशी तीन नवीन ट्रॅक्टर लाँच केली आहेत. या ट्रॅक्टरची किंमत ८ ते ९ लाख रुपये आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असा कंपनीचा दावा आहे. डीआय इंजिन, हेलिकल गियर्स, ट्रान्समिशन आणि व्हीझेड मेटिक हायड्रोलिक्स ही या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये आहेत. शेतकामासोबत वाहतूकीसाठी ट्रॅक्टर फायदेशीर असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 

१०० दिवसांची कृती कार्यक्रम आखणी

केंद्र सरकार एक राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण परिवर्तन परिषद स्थापन करण्याची योजना आखत आहे. या परिषदेतून कृषी आणि ग्रामीण भागातील विकास कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे सदस्य असतील. वस्तु आणि सेवा कर परिषदेच्या धर्तीवर या परिषदेची स्थापना करण्यात येईल, अशीही चर्चा आहे.  कृषी सचिव मनोजआहुजा यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक झाली. या बैठकीत ग्रामीण विकास. सहकार आणि पंचायत राज मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते. नव्यानं सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम निश्चित करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय नियोजन आहे. त्यामध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण परिवर्तन परिषदेची स्थापन करण्याची योजना आखण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक अवजारांची निर्मिती

शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी ई अस्त्रा एनएसीओएफ ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेडनं ई-वीडर, ई-रीपर, ई-ब्रश कटर आणि ई-कार्गो मल्टी-युटिलिटी थ्री व्हीलर या उपकरणांची निर्मिती केली आहे. एनएसीओएफही एक खाजगी कंपनी आहे. देशातील शेतकऱ्यांना किफायतशीर दरात तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक व्हीकलचा वापर करता यावा, यासाठी इलेक्ट्रिक उपकरणांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वाहनं देऊन त्यांच्या समस्या कमी होतील, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळे इलेक्ट्रिक उपकरणाची निर्मिती केली जात असल्याचं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश बाबू पी यांनी सांगितलं.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT