Dairy Business Agrowon
ॲग्रो विशेष

Israel Dairy Business : दुग्ध व्यवसायात जगात अव्वल इस्राईल

Diwali Article 2024 : अत्याधुनिक शेती-तंत्रज्ञानाबरोबरच इस्राईल देशाने दुग्ध व्यवसायातही जगात अव्वल स्थान निर्माण केले आहे. वाळवंटी हवामानाला सहनशील आणि जगात विक्रमी दूध देणाऱ्या गायींचे ‘ब्रीड’ तयार करून या देशाने दूध उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याबरोबरच निर्यातीतही ठसा उमटवला आहे.

मंदार मुंडले 

Dairy Industry : जगभरातील शेतकऱ्यांसाठी इस्राईलची भूमी ज्ञानपंढरी म्हणूनच ओळखली जाते. त्याला कारणही तसेच आहे. अत्याधुनिक शेती- तंत्रज्ञानाबरोबरच दुग्ध व्यवसायातही या देशाने जगात अव्वल स्थानावर आपले नाव कोरले आहे.

वाळवंटी प्रदेश, उष्ण हवामान, अत्यंत कमी पर्जन्यमान, शेजारी असलेल्या शत्रू राष्ट्रांमुळे सातत्याने उदभवणारी युद्धजन्य स्थिती अशी एक ना अनेक आव्हाने झेलून इथला शेतकरी धाडसी, कणखर वृत्तीने शेतीत कष्ट करतो आहे. अभ्यासूवृत्ती जपण्याबरोबर शास्त्रीय प्रशिक्षणातून व्यावसायिक ज्ञानात तो पारंगत झाला आहेत. आज भारत आणि अन्य विकसनशील देशांनीही इस्राईलकडून प्रेरणा घेत आपल्या दुग्ध व्यवसायात बदल घडवून आणले आहेत.

इस्राईलच्या डेअरी उद्योगाला खरे तर १८ व्या शतकापासूनची परंपरा आहे. त्या वेळी स्वतंत्र देश असे त्याचे अस्तित्व नव्हते. ज्यू लोकांनी इथे वसाहती स्थापन करायला सुरुवात केली होती. स्थानिक गायींचे संगोपन करता करता सन १८८० मध्ये पहिला आधुनिक डेअरी फार्म वसवण्यात आला.

पुढे या व्यवसायात विविध स्थित्यंतरे घडत गेली. आणि मधल्या शतकांच्या प्रदीर्घ वाटचालीतून २०२२ पर्यंत या देशाने सुमारे १.५ अब्ज ते १.६ अब्ज लिटर वार्षिक दूध उत्पादनापर्यंत (गायीचे दूध) मोठी मजल मारली. गायीच्या दुधापासून फ्ल्यूड मिल्क, फरमेंटेड मिल्क, डेझर्ट, चीज, बटर आदी पदार्थ तयार केले जातात.

या देशात शेळी व मेंढींचेही फार्म्स आहेत. वर्षाला शेळीचे १.३ कोटी लिटर, तर मेंढीचे एक कोटी लिटर दूध संकलित होते. या दुधापासून सॉप्ट- हार्ड चीज, योगर्ट, बटर आदी उत्पादने तयार केली जातात. त्यांची वार्षिक बाजारपेठ काही हजार टनांमध्ये आहे. दूध प्रक्रिया उद्योगात तीन मोठ्या कंपन्या कार्यरत असून, त्यांच्याकडून देशातील ९२ टक्के बाजारपेठ नियंत्रित केली जाते. छोट्या डेअऱ्यांची संख्या सुमारे शंभरपर्यंत आहे.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT