Ashadhi Wari 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025 : सर्व यंत्रणांनी गर्दी व्यवस्थापन, घटना प्रतिसाद प्रणालीचे प्रशिक्षण घ्यावे

Disaster Management Training : पंढरपुरात आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणालीचे काटेकोरपणे अंमलबजावणी प्रशासन करत असते.

Team Agrowon

Solapur News : पंढरपुरात आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणालीचे काटेकोरपणे अंमलबजावणी प्रशासन करत असते. या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गर्दी व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणाली बाबतच्या प्रशिक्षणात अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर मार्गदर्शन करत होत्या. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, छत्तीसगड येथील इमर्जन्सी अधिकारी विशाल वासवानी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सहाय्यक अधिकारी अर्चना बिसोई यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर म्हणाल्या, २६ जून ते १० जुलै या कालावधीत आषाढी वारी पंढरपूर येथे होत असून, या कालावधीत सुमारे पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात या यात्रेचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत केले जाते.

व्यवस्थापनाच्या सुलभतेसाठी आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने घटना प्रतिसाद प्रणाली लागू केलेली आहे. जिल्ह्यात ही प्रणाली २०१५ पासून राबवली जात असून, सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांनी व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गर्दी व्यवस्थापन व घटना प्रतिसाद प्रणालीचे अत्यंत बारकाईने प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले यांनी या प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला.

...म्हणून प्रणाली प्रभावी

आषाढी वारी यात्रेतील गर्दीचे व्यवस्थापनाबाबत युनिसेफचे इमर्जन्सी ऑफिसर विशाल वासवानी यांनी मार्गदर्शन केले. आपत्कालीन नियोजनाबरोबरच कोणत्याही व्यवस्थापनातील यशासाठी महत्त्वपूर्ण घटक असलेला संपर्क या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. तसंच घटना प्रतिसाद प्रणाली आपत्तीजन्य परिस्थितीत धोका कमी करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा आहे, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT