Khandesh Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Water Project : खानदेशातील सिंचन प्रकल्प कोरडेच

Khandesh Rain Update : खानदेशात पावसाने दडी मारली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस मध्यंतरी झाला. पण सिंचन प्रकल्प कोरडे आहेत.

Team Agrowon

Jalgaon Rain Update : खानदेशात पावसाने दडी मारली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस मध्यंतरी झाला. पण सिंचन प्रकल्प कोरडे आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील सातपुडालगत व पश्‍चिम भागातील अग्नावती, बहुळा, मन्याड, अंजनी हे प्रकल्प भरण्याची प्रतीक्षा आहे.

तापी नदीवरील हतनूर (ता. भुसावळ) येथील हतनूर प्रकल्पाचे दरवाजे मागील वर्षी जूनच्या अखेरीस उघडले होते. कारण प्रकल्पात साठा वाढला होता. परंतु यंदा त्यातून विसर्ग सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणावर जिल्ह्याची मदार आहे. २१ हजार हेक्टर क्षेत्राला हा प्रकल्प वरदान ठरतो. तसेच १०० पेक्षा अधिक गावांची व चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी शहरांची तहीनही भागवितो. पण त्यातही पाण्याची आवक नाही.

जिल्ह्यातील रावेरातील सुकी, मंगरूळ, यावलमधील गारबर्डी, जामनेरातील तोंडापूर, पारोळ्यातील बोरी हे प्रकल्पदेखील कोरडे होत आहेत.

यावलमधील मोर, पाचोऱ्यातील अग्नावती व बहुळा, भोकरबारी, चाळीसगावमधील मन्याड, एरंडोलातील अंजनी हे प्रकल्प मागील वर्षी जुलैच्या मध्यात ५० टक्क्यांवर भरले होते. परंतु यंदा त्यात आवकच नाही. कारण लाभक्षेत्रात पाऊस झालेला नाही.

धुळ्यातील अमरावती, कनोली, करवंद, सोनवद, वाडीशेवाडे, शिरपुरातील अनेर हे प्रकल्पदेखील रिकामे होत आहेत.

धुळ्यात बुराई, पांझरा, मालनगाव, बुराई हे प्रकल्प मागील वर्षी १०० टक्के भरले होते. त्यातील साठाही आता २० टक्क्यांखाली आहे. जुलैचा पहिला आठवडा संपत आला आहे. मात्र अनेक प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झालेला नाही. मध्यंतरी तुरळक, हलका, असा पाऊस झाला. पण त्यामुळे फारसा लाभ झालेला नाही.

नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील अग्नावती प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून सुरुवातीलाच भरत होता. अग्नावती नदीत सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. नंदुरबारमधील दरा, सुसरी व इतर तीन लघू प्रकल्प कोरडेच आहेत.

गिरणा धरण भरले

चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणाचे लाभक्षेत्र नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिकमध्ये चांगला पाऊस झाला. यामुळे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी १०० टक्के भरले आहे.

जिल्ह्यातील सर्वांत मोठे म्हणजेच १८ टीएमसी एवढी साठवण क्षमता गिरणा धरणाची आहे. गिरणा पट्ट्यात त्याचा चांगला लाभ रब्बीसह टंचाई दूर करण्यासाठीदेखील होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT