Pune Weather Update : मॉन्सून सक्रिय होणार असल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. आज (ता. ५) कोकण, कोल्हापूर, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम भाग सर्वसाधारण स्थितीत, तर पूर्वभाग सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सरकला आहे. हा पट्टा राजस्थानच्या गंगापूरपासून, दिल्ली, अलिगड, हमीरपूर, प्रयागराज, डाल्टेनगंज, बालासोरपासून मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा गुजरातपासून केरळ किनारपट्टीपर्यंत विस्तारला आहे. १५ अंश उत्तर अक्षांशालगत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र आहे. उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर प्रदेश, गुजरातमध्येही चक्राकार वारे वाहत आहेत.
दक्षिणेकडे आलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कोकणासह, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. पालघर, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची, तर विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
पालघर, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली.
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.
कोकण, घाटमाथ्यावर सरींवर सरी
कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा ओसरला असली, तरी सरीमागून सरी सुरू आहेत.धरणांच्या पाणलोटात देखील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे.
मंगळवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण :
हर्णै, अलिबाग प्रत्येकी १४०, दापोली १३०, सुधागड पाली, मंडणगड प्रत्येकी ११०, माणगाव ९०, मुरूड, म्हसळा, वाकवली, खेड, सावंतवाडी, श्रीवर्धन प्रत्येकी ८०, पोलादपूर, माथेरान, रत्नागिरी प्रत्येकी ७०, गुहागर, मालवण, रोहा प्रत्येकी ६०, तळा, देवगड, महाड प्रत्येकी ५०.
मध्य महाराष्ट्र :
महाबळेश्वर, सोलापूर प्रत्येकी ७०, मोहोळ, लोणावळा, गगनबावडा प्रत्येकी ५०, इंदापूर ४०, जेऊर, फलटण, शाहूवाडी प्रत्येकी ३०.
मराठवाडा :
तुळजापूर ४०, सिल्लोड २०, आष्टी १०.
घाटमाथा :
डुंगरवाडी १२०, शिरगाव ११०, ताम्हिणी, भिरा प्रत्येकी ९०, आंबोणे ७०, दावडी ६०, कोयना नवजा प्रत्येकी ५०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.