Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : खानदेशात भारनियमनामुळे सिंचनात अडथळे कायम

Agriculture Load Shading : भारनियमन आणि तांत्रिक अडचणींमुळे सतत वीजपुरवठा खंडित होण्यासह इतर कारणांमुळे रब्बी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : भारनियमन आणि तांत्रिक अडचणींमुळे सतत वीजपुरवठा खंडित होण्यासह इतर कारणांमुळे रब्बी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. शेतात पाणी असूनही अनेकांना पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे अनेक भागांत शेतकरी विद्युत पंप सुरू करण्यासाठी जनरेटर आणि सौरपंपांचा वापर करू लागले आहेत.

महावितरण प्रशासनाने शेती शिवारातील वीजपुरवठा सुरळीत करावा, भारनियमन बंद करावे अशी मागणी होत आहे. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र वीज वेळेवर मिळत नसल्याने रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकांना पाण्याची मात्रा देताना शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

खानदेशात सातपुडालगत व इतर सर्वच भागांत विजेची समस्या आहे. मध्येच वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे पिकांचे सिंचन करण्यासाठी आता शेतकरी सौरऊर्जा प्लांट, जनरेटरद्वारे पंप चालवून गहू, हरभरा पिकाला पाणी देत आहेत.

पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. दिवसा किमान आठ तास वीज देण्याचे निश्‍चित आहे. परंतु प्रत्यक्षात वीज फक्त साडेसहा तास मिळते. रात्रीदेखील वीज बंद होते. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

‘महावितरण’कडून कार्यवाही होईना

वीज मध्येच बंद होते, लागलीच सुरू होते. यामुळे कृषिपंप खराब होतात. ते दुरुस्त करण्यासाठी हकनाक खर्च करावा लागतो. एक पाच ते सात अश्‍वशक्तीचा कृषिपंप दुरुस्त करण्यासाठी पाच ते सहा हजार रुपये लागतात.

पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. दिवसा किमान आठ तास वीज देण्याचे निश्‍चित आहे. परंतु प्रत्यक्षात वीज फक्त साडेसहा तास मिळते. रात्रीदेखील वीज बंद होते. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement: आधारभूत किंमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको

Soybean Procurement: ग्रेडरांच्या विळख्यात सोयाबीन खरेदी

Onion MSP: कांद्याला हमीभावाचे संरक्षण मिळणार का? 

Solar Pump Scheme: माजलगावात अल्पभूधारकांना मिळेना सौर कृषिपंप योजना

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे पैसे ६ हजार रुपयांवरून १२ हजार होणार का? संसदेत सरकारनं दिली माहिती

SCROLL FOR NEXT