Iran President Ebrahim Raisi Agrowon
ॲग्रो विशेष

Iran President Ebrahim Raisi : हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांचे निधन

Aslam Abdul Shanedivan

Pune News : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी (वय ६३ वर्षे) यांचे रविवारी (ता.१९) हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या अपघातात रईसी यांच्यासह ९ सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. तर हा अपघात इराणची राजधानी तेहरानपासून ६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अझरबैजानच्या सीमावर्ती शहर जोल्फाजवळ झाला. या अपघातात मृत झालेल्या ९ जणांमध्ये परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्लाहियान आणि पूर्व अझरबैजानचे गव्हर्नर मलिक रहमाती यांचा समावेश आहे. 

इराणी मीडिया चॅनेलने सांगितले आहे की, बचाव पथकांना रईसी यांच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. मात्र, अध्यक्ष आणि त्यांचे साथीदार वाचले की नाही याची माहिती रेड क्रेसेंटने दिलेली नाही. त्याचवेळी, दुसऱ्या इराणी प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार, रईसी यांच्यासह पथकातील सर्व ९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लायान, पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलेक रहमती, तबरीझचे रॉयल इमाम मोहम्मद अली अलहाशेम तसेच पायलट, सहवैमानिक, क्रू प्रमुख, सुरक्षा प्रमुखांसह एक सुरक्षा रक्षक होता.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते आणि यापैकी दोन हेलिकॉप्टर त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षित उतरले. मात्र रईसी यांच्या पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. ज्याच त्यांचे निधन झाले. दरम्यान बचाव कार्यासाठी १६ पथके तैनात करण्यात आली असून अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची तपासणी केली जात आहे. 

मोदींनी व्यक्त केला शोक 

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायसी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया लिहिले की,  भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात रईसी यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या संवेदना. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे.

कोण आहे इब्राहिम रायसी?

रईसी हे इराणचे संभाव्य भावी सर्वोच्च नेते मानले जात होते आणि त्यांना तेहरानचे बुचर देखील म्हटले जात होते. रईसी यांनी २०२१ मध्ये निवडणुकीनंतर इराणचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. यावेळी त्यांना देशभरात उसळलेल्या विरोधाला तोंड द्यावे लागले होते. तसेच त्यांच्यावर निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. 

इराणचे सर्वोच्च नेते आणि सर्वात शक्तिशाली धार्मिक नेते अली खमेनी यांचे राजकीय सहयोगी आणि संभाव्य उत्तराधिकारी म्हणून रईसी यांच्याकडे पाहिले जात होते. रईसी यांच्याकाळात इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाजन स्थिती उद्भवली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र डागण्यात आली होती. 

रईसी यांची कारकिर्द ही हिजाब वादावरूनही अधोरेखीत होतो. येथे हिजाबचा वाद उफाळून आला होता. इराणच्या 'हिजाब आणि शुद्धता कायद्याची' सक्ती रईसी यांनी केली होती. यावरून देखील तेथे तीव्र विरोध झाला होता. याविरोधादरम्यान महसा अमिनी आणि अर्मिता गेरावंड या महिलांची मृत्यू झाला होता. यांची मृत्यू पोलीस कोठडीत झाली होती. यानंतरच इराणमध्ये हिजाबवरून तीव्र विरोध झाला होता. लोकांनी हिजाब घालण्यास नकार देत केस कापण्यास सुरुवात केली होती. (सोर्स : दैनिक जागरण आणि अमर उजाला) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT