DCM Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

DCM Ajit Pawar : जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु; अजित पवार अडचणीत?

Jarandeshwar Sugar Factory : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडीत असणाऱ्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी पुन्हा सुरू झाली आहे. कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी पुणे लाचलुचपत विभाग चौकशी करणार आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी शांत झालेले जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यावहार प्रकरणी पुन्हा एकदा चौकशी सुरू झाली आहे. याप्रकरणी पुणे लाचलुचपत विभाग चौकशी करणार असून गैरव्यावहारसह कोरेगाव भुखंड आणि डीस्टलरी प्रकल्पाबाबत चौकशी केली जाणार आहे. यामुळे अजित पवार यांच्या मागे पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा सुरु झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान याआधी जरंडेश्वर कारखान्याच्या गैरव्यावहारसह कोरेगाव भुखंड आणि डीस्टलरी प्रकल्पाबाबत ईडीने चौकशी केली होती. तसेच ईडीने चार्जशीट दाखल केली होती. मात्र याच चार्जशीट अजित पवार यांचे नाव वगळले होते. यावरून त्यांनी क्लिन चिट मिळाल्याचे बोलले जात होते. तर याच प्रकरणांच्या चौकशींमुळे ते भाजपसोबत गेल्याचे बोलले गेले. मात्र आता पुन्हा एकदा पुणे लाचलुचपत विभागामार्फत चौकशीचा फेरा सुरू झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ईडीने केला होता. तसेच याप्रकरणी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकामे ईडीने ताब्यात घेतली होती. तर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा अजित पवार यांच्याशी निगडीत आहे. यामुळे या प्रकरणात अजित पवार यांच्यावर आरोप झाले होते. याच आरोपानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

तसेच २०१० साली जरंडेश्वर कारखाना विक्रीस काढण्यात आल्यानंतर तो मूळ किंमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आला होता. ज्यात कार्यपद्धीवरून टीका आणि आरोप झाले होते. मात्र अजित पवार यांनी याबाबतचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच ईडी या प्रकरणाची चौकशी करत असून तथ्य बाहेर येईल ते म्हणाले होते. तर लिलाव प्रकरणावरून देखील खुलासा करताना, लिलाव सर्व नियमांचे पालन करूनच झाला असे ही अजित पवार यांनी म्हटले होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT