Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांत हस्तक्षेप करा, अन्यथा दारात कांदे ओतू : किसान सभा

कांद्याचा दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील भाजप-शिंदे सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.

Team Agrowon

Onion Rate : नाशिक : सरकारने कांदा उत्पादकांना मदत करण्यासाठी हस्तक्षेप न केल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमत्री व कृषिमंत्री यांच्या दारात कांदे ओतण्याचे आंदोलन किसान सभा हातात घेईल, असा इशारा किसान सभेने दिला आहे.  

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बारे गावी शेतकऱ्यांची जिल्हास्तरीय जाहीर सभा घेऊन किसान सभेने हा इशारा दिला आहे.

किसान सभेच्या नाशिक जिल्हा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या या जाहीर सभेसाठी जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसोबत कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी किसान सभेचे माजी अध्यक्ष जे. पी. गावीत, किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांच्यासह किसन गुजर, सुभाष चौधरी, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इरफान शेख, इंद्रजित गावीत, मोहन जाधव, भिका राठोड, धर्मराज शिंदे, हणमंत गुंजाळ, नवनाथ दळवी, त्रंबक ठाकरे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कांद्याचा दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील भाजप-शिंदे सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.

मात्र सरकार सत्तेच्या साठमारीत मश्गुल असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही.

सरकारने शेतकऱ्यांची उपेक्षा थांबवावी व कांदा उत्पादकांना तातडीने मदत करावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

तसेच कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांद्याला तातडीने निर्यात अनुदान देत कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे व  कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ६०० रुपये अनुदान जाहीर करावे अशी मागणी किसान सभेने केली आहे.

कांद्याचे दर निश्चित करणाऱ्या लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, मनमाड, चांदवड व नांदगाव बाजार समित्या, तसेच नगर व पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सभा आयोजित केली. आणि कांदा उत्पादकांसाठी आक्रमक आंदोलन उभे करण्याचा संकल्प किसान सभेने केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT