Agriculture Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Interest Waive Scheme : मुदतीत कर्जफेड केल्यास होणार व्याज माफ ; राजस्थान सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

Agriculture Loan Interest : राज्यातील शेकऱ्यांसाठी सराकरने शून्य टक्के व्याजमुक्त पीककर्ज योजना लागू केली आहे.

Team Agrowon

Crop Loan Update : पीकर्जाची मुदतीत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राजस्थान सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेकऱ्यांसाठी सराकरने शून्य टक्के व्याजमुक्त पीककर्ज योजना लागू केली आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेकडून पीककर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जाची मुदतीत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज द्यावे लागत नाही. मात्र, वेळेवर कर्जफेड करणाऱ्यास असमर्थ असणाऱ्या शेतकऱ्यांना १० टक्के व्याज द्यावे लागते.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशांनुसार, रब्बी हंगाम २०२३-२४ (सप्टेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४) अंतर्गत वितरित केलेल्या अल्पमुदत कर्जाची अंतिम देय दिनांक ३० जून २०२४ पासून दोन महिने पुढे ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत किंवा कर्ज घेतलेल्या तारखेपासून १२ महिने, यापैकी जे आधी असेल त्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे वेळेवर शेतकऱ्यांनी कर्जफेड करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेवून कर्जाची मुदतीत फेड करावी. अन्यथा मुदतपार झाल्यामुळे शेतकरी पुढील पीककर्जासाठी अपात्र होवू शकतात. तसेच त्यांना १० टक्के व्याज भरावे लागेल.

पंरतू वेळेत कर्जफेड केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. काही कारणास्तव समितीस्तरावर शेतकऱ्यांच्या कर्ज वसूली जमा होण्यास अडचणी येत असतील, तर शेतकऱ्यांनी संबंधित बँकेच्या शाखेमध्ये जावून रोखीने कर्जाची रक्कम भरू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT