Mango  Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Interest Waive : आंबा उत्पादक शेतकऱ्यांना व्याजमाफी

Mango Producer : २०१५ च्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : फेब्रुवारी आणि मार्च २०१५ मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने तीन महिन्यांच्या कालावधीतील २ कोटी ७१ लाख ४६ हजार ८६० रुपयांची व्याजमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे.

याव्यतिरिक्त २०१४-१५ वर्षातील रूपांतरित कर्जावरील २०१५-१६ या वर्षातील संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षांचे सहा टक्के दराने होणारे व्याज रूपांतरित कर्जाचा वार्षिक हप्ता विहित मुदतीत परत करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

२०१५ च्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ११ हजार ७८३ शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या व्याजमाफीवरील दोन कोटी ७१ लाख ४६ हजार रुपयांची कर्जावरील व्याजमाफी देण्यात येणार आहे.

तसेच २०१४-१५ या वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांचे २०१५-१६ या वर्षातील संपूर्ण व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच पुढील चार वर्षांचे ६ टक्के दराने होणारे व्याज ४ कोटी ९८ लाख ८५ हजार रुपये रूपांतरित कर्जाचा वार्षिक हप्ता मुदतीत परत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे शेतकरी नैसर्गिक आपत्तीने बाधित असण्याची अट शिथिल करून रूपांतरित कर्जावरील व्याजमाफी योजनेंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ व महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव संबंधित बँकांनी रत्नागिरी जिल्हा उपनिबंधकाकडे दाखल करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bopodi Land Dispute: बोपोडीतील वादग्रस्त जमीन पूर्णतः शासकीय मालकीची

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’ जमीन विक्री व्यवहार ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

Ai in Agriculture: ऊस उत्पादकता वाढीत ‘एआय’चे मोठे योगदान

Canal Committee Meeting: कालवा सल्लागार समिती बैठकीला आचारसंहितेचा अडसर

Rabi Crop Competition: रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पीकस्पर्धा

SCROLL FOR NEXT