Animal Husbandry Department Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry Scheme : ‘पशुसंवर्धन’ योजनेतून व्याज सवलत

Team Agrowon

Solapur News : ‘‘केंद्र शासनाने दुग्ध व्यवसाय पायाभूत सुविधा विकास निधी व पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या दोन योजनांचे एकत्रीकरण करण्यास व सुधारित योजना २०२५-२६ पर्यंत राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत बँकांकडून घेतलेल्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत मिळणार आहे. या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. जी. बोरकर यांनी केले.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी ही केंद्र पुरस्कृत योजना २०२०-२१ पासून अमलात आणली जात आहे. या योजनेतून दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन अशा दोन स्वतंत्र योजना होत्या, पण आता त्यात सुधारणा करत या योजना एकत्र केल्या आहेत. सुधारित योजनेचा शेतकरी उत्पादक संस्था, खासगी कंपन्या, वैयक्तिक उद्योजक, सेक्शन आठ नोंदणीकृत कंपन्या, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग आणि सहकारी दुग्ध संघ यांना लाभ घेता येईल.

दूध प्रक्रिया योजनेअंतर्गत नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या आणि अस्तित्वात असलेल्या दुग्ध प्रक्रिया केंद्रांमध्ये गुणवत्तापूर्वक व स्वच्छ आरोग्यदायी पिशवीबंद दुग्ध प्रक्रिया. विपणन पायाभूत सुविधा, दूध वाहतूक सुविधा, संशोधन आणि विकास (प्रयोगशाळा आणि उपकरणे, नवीन तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण दुग्धपदार्थ विकास,

अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा / केंद्र, ट्रायजेन / एनर्जी इफिशिएन्सी इन्फ्रास्ट्रक्चर, मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, नव्याने स्थापन होणाऱ्या आणि अस्तित्वातील आइस्क्रीम, चीज, अतिउच्च तापमानात दूध प्रक्रिया, सुगंधित दूध, दूध पावडर, व्हे पावडर आदी मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आदी उद्योग- व्यवसायांचा समावेश आहे,’’ असे बोरकर म्हणाले.

पशुखाद्य निर्मिती आणि बळकटीकरण

‘‘लघू, मध्यम व मोठ्या पशुखाद्य निर्मिती केंद्रांची स्थापना करता येईल. याशिवाय खाद्य विटा (टोटल मिक्स्ड रेशन) निर्मिती केंद्र, बायपास प्रथिने निर्मिती केंद्र, खनिज मिश्रण निर्मिती केंद्र, एकात्मिक कुक्कुट प्रक्षेत्र आणि कुक्कुट खाद्य निर्मिती, समृद्ध चारा निर्मिती केंद्र, पशुखाद्य निर्मिती समवेत पशुखाद्य तपासणी प्रयोगशाळा यांचाही या योजनेत समावेश आहे,’’ असे बोरकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Edible Oil Rate : तीस लाख टन साठा संपेपर्यंत खाद्यतेलाच्या किमती वाढवू नका

Vasantdada Sugar : ‘वसंतदादा शुगर’च्या धर्तीवर चालणार सिट्रस इस्टेटचा कारभार

Shwetkranti 2.0 : केंद्रीय मंत्री शहांच्या हस्ते ‘श्‍वेतक्रांती २.०’चा प्रारंभ

Bioenergy Production : जैवऊर्जा निर्मितीचा पहिला टप्पा फसला

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

SCROLL FOR NEXT