Dairy Processing : दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया मूल्यवर्धन काळाची गरज

Dairy Production : केवळ दूध विक्री करून शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन होत नाही. तर याच दुधावर प्रक्रिया करून त्याचे पदार्थ विक्री केले तर आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे यांनी केले.
Dairy Processing
Dairy ProcessingAgrowon
Published on
Updated on

Akola News : केवळ दूध विक्री करून शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन होत नाही. तर याच दुधावर प्रक्रिया करून त्याचे पदार्थ विक्री केले तर आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे यांनी केले. आत्माच्या पुढाकाराने एकदिवसीय जिल्हाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षणाचे कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

Dairy Processing
Dairy Loan : दुग्धव्यवसायाची कर्ज प्रकरणे निकाली काढा

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ठाकरे यांच्यासह डॉ. गोपाल मंजुळकर, आत्मा तालुका तंत्र अधिकारी व्ही. एम. शेगोकार, सचिन गायगोळ, सरपंच उमा माळी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Dairy Processing
Success Story of Dairy Business : दुग्ध व्यवसायात महिला बचत गटाची आघाडी

डॉ. मंजुळकर यांनी स्वच्छ दूध निर्मिती, जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, जनावरांची निवड, पशू आहार, दूध व दुग्धजन्य प्रक्रिया, चारा पिकांची लागवड, गोठा बांधकाम करताना घ्यायची काळजी, दुग्धजन्य पदार्थापासून विविध प्रक्रिया केलेले पदार्थ याविषयी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.

त्यानंतर शेगोकार यांनी कृषी विभाग व आत्मा यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी दूध उत्पादन करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी कृषी विभाग व आत्मा यंत्रणा कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com