Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची उघडीप

Monsoon Rain : राज्यातील पावसाचा जोर ओसरण्यास सुरवात झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील पावसाचा जोर ओसरण्यास सुरवात झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. कोकण व घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. कोकणातील कळकवणे येथे १४२.७५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

सध्या कोकणात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे भात रोपवाटिकेची कामे, भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. घाटमाथ्यावरही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. कोयना, डुंगरवाडी, लोणावळा, भिरा, धारावी या घाटमाथ्यावर मध्यम पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातही पुणे, नाशिक भागांत अधूनमधून सरी बरसत आहेत. परंतु अनेक भागात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. पश्चिम भागात भात रोपवाटिकेची कामे सुरू झाली आहेत. पुणे जिल्हयात सुमारे तीन हजार २४० हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या आहेत. नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात काही प्रमाणात ऊन पडल्याची स्थिती आहे. खानदेशातही पावसाने उघडीप दिली आहे.

मराठवाड्यात अपवाद वगळता सर्वच भागात पाऊस थांबला आहे. शेतातील पाणी कमी झाल्याने खरीप पेरण्यांना सुरवात झाली आहे. काही ठिकाणी अजूनही वाफसा स्थिती नाही. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस पिकांच्या पेरण्यांनी वेग पकडला आहे. शुक्रवारी (ता. १४) परभणी भागात तुरळक सरी बरसल्या. विदर्भात पाऊस नसला तरी काही भागात ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे.

शुक्रवारी (ता.१४) सकाळी नऊ वाजेपर्यंतचा मंडलनिहाय पाऊस (मिमी) : स्रोत - कृषी विभाग.

कोकण : ठाकुरली ७८.२५, अप्पर ७८.२५, करंजवाडी ६७, खामगाव ६८.७५, सावर्डे ६९.७५, बुरोंडी ८१, आंबलोली ८४.५०, मंडणगड ७०.७५, पावस ७५.२५

मध्य महाराष्ट्र : शहा ७४.५०, किनी ८६.५०, वडूज ६७ कातरखटाव ६७, लामज ७२.

मराठवाडा : तुर्काबाद ७२.७५, वाळुंज ७२.७५, आळंद ८८.२५, कंधार ७५.२५, सोनखेड ६७.७५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT