Rain Update : पावसाचा जोर ओसरल्याने शेतीकामे सुरू

Monsoon Rain : खानदेश आणि विदर्भाच्या काही भागात मॉन्सून सरकत असताना उर्वरित भागातील पावसाचा प्रभाव कमी होत आहे.
Agriculture Work
Agriculture WorkAgrowon
Published on
Updated on

Pune News : खानदेश आणि विदर्भाच्या काही भागात मॉन्सून सरकत असताना उर्वरित भागातील पावसाचा प्रभाव कमी होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अत्यंत कमी झाला आहे. सध्या तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खरिपाच्या कामांना वेग आला शेतीकामे करून घेण्यासाठी शिवारांत लगबग सुरू असल्याची स्थिती आहे.

गेले आठ दिवस राज्यातील विविध भागांत मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे भात खाचरे भरून वाहू लागली आहेत. काही ठिकाणी रोपवाटिकांच्या कामांना सुरवात झाली आहे. गुरुवारी ता. १३) दिवसभर कोकणासह सर्वच भागात ढगाळ वातावरण राहिले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्या. रत्नागिरीतील भांबेड येथे ८३, तर टेरव येथे ७९.३ मिलिमीटर पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. खानदेशात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. धुळे जिल्ह्यातील धुळे, खेड आणि कुसुंबा येथे ६२.८ मिलिमीटर पाऊस पडला. इतर भागात रिपरिप राहिली. मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर भागांत हलका, तर तर बारामती, सणसर येथे सर्वाधिक ८१ मिलिमीटर पाऊस पडला.

Agriculture Work
Rain Alert : पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप

नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. या भागात मागील आठ दिवसांपासून पाऊस पडत असल्याने ओढे, नाले भरून वाहत आहेत. सोलापूर, सांगली जिल्ह्यांत पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे या भागात वाफसा स्थिती येत असल्याने शेतकऱ्यांची पेरण्या करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मराठवाड्यातही सर्वच भागात पावसाचा जोर कमी झाला आहे.

Agriculture Work
Maharashtra Rain : सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी संततधार सुरूच

या भागात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असली तरी तुरळक ठिकाणी अधूनमधून पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन पेरण्यांना सुरवात केली आहे. विदर्भाच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणी दोन दिवसापासून पाऊस कोसळत आहे. परंतु आता या भागातील पाऊस कमी झाला आहे. बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला आहे. उर्वरित भागात अजूनही जोरदार पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्यांना काही प्रमाणात उशीर होत असल्याची स्थिती आहे.

गुरुवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस (मिमी) : स्रोत - कृषी विभाग.

कोकण : गोरेगाव ५०.८, लोणेरे ५०.८, मार्गताम्हाणे ५२.५, सावर्डे ६३.३, कळकवणे ६८.०, अबलोली ६०.०, आंगवली ५०.०, देवरुख ५५, आंबोली ५३.८.

मध्य महाराष्ट्र : मनमाड ५३, राशीन ५८.३, आश्‍वी ५५.५, पिंपरणे ५५.५, बारामती ८१, सणसर ८१, रावणगाव ५०, राजळे ६६, गगनबावडा ६०.०.

विदर्भ : वडशिंगी ३०, हिवरखेड ५०.५, अडगाव २५.८ , महान ४०.५, गोवर्धन ४८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com