Marathwada Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत पावसाचा जोर कमीच

Latest Rain Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, जालना व धाराशिव या पाचही जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर कमीच राहिला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, जालना व धाराशिव या पाचही जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर कमीच राहिला आहे. बहुतांश तालुके व मंडलांत पावसाची हजेरी लागली नाही दुसरीकडे जालना जिल्ह्यातील वरुड बु. मंडलात ७५.८ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८४ पैकी २७ मंडलांत १ ते ४२ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. जिल्ह्यातील उस्मानपुरा मंडलात १५ मिलिमीटर, पिंपळवाडी २१.८, तर पैठण मंडलात सर्वाधिक ४२ मिलिमीटर पाऊस झाला.

इतर २४ मंडलांत तुरळक हलका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी केवळ १७ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम, तर एक-दोन मंडलांत दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील केज मंडलात ४६ मिलिमीटर, धानोरा १९.५, धोंडराई १६.५, दिंद्रुड १९.८, नांदुरघाट २२, तेलगाव २७, तर वडवणी मंडलात ३० मिलिमीटर पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातील ६० पैकी २६ मंडलांत पावसाची हजेरी लागली पान चिंचोली मंडलात सर्वाधिक ५५ किलोमीटर पाऊस झाला बेलकुंड मंडलात २२.८ मिलिमीटर पोहेगाव १९.३, तर पळशी मंडलात २१.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जालना जिल्ह्यातील वरुड बुद्रुक मंडलात ७५.८ मिलिमीटर इतके अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील बारा मंडलांत पावसाची हजेरी लागली.

माहोरा मंडलात ४६.८, तीर्थपुरी २८.८, मंठा १५.३ मिलिमीटर पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातील ४२ पैकी केवळ १३ मंडलांत पावसाची हजेरी लागली. कळंब तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली.

इतरही तालुक्यांत बहुतांश मंडलांत पावसाची हजेरी नव्हती. जिल्ह्यातील वाशी मंडलात २२.३ मिलिमीटर, भूम ५७.८, तर इटकळ मंडलात १८.३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. इतर दहा मंडलांत पाऊस तुरळक, हलक्या स्वरूपाचा होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT