Padmakar Kunde Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : चांगल्या कापूस उत्पादनासाठी एकात्मिक कीडनियंत्रण करावे

Cotton Production : ‘‘कापूस पिकात कमी खर्चात चांगले उत्पादनही अनेक जण साध्य करतात. त्यासाठी एकात्मिक कीडनियंत्रण कार्यक्रमावरही भर दिला पाहिजे,’’

Team Agrowon

Nandurbar News : ‘‘कापूस पिकात कमी खर्चात चांगले उत्पादनही अनेक जण साध्य करतात. त्यासाठी एकात्मिक कीडनियंत्रण कार्यक्रमावरही भर दिला पाहिजे,’’ असा सल्ला कोळदा (ता.नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ पद्माकर कुंदे यांनी दिला.

सारंगखेडा (ता. शहादा) येथे कापूस पिकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘अॅग्रोवन’ व रेवुलीस इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात कुंदे यांच्यासह रेवुलीस इरिगेशन इंडिया प्रा.ली.चे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे, व्यवस्थापक एकनाथ अहिरे, अभियंता अनिकेत कुवर, अंकुश जगताप, रवींद्र भामरे, सारंगखेडा येथील सरपंच पृथ्वीराज रावल, मोहनसिंह गिरासे, भूविन पाटील, दत्तात्रेय बागल आदी उपस्थित होते.

श्री. कुंदे म्हणाले, ‘‘कापूस लागवड करताना सघन पद्धत अवलंबली पाहिजे. त्यात लागवडीचे अंतर तीन बाय दीड फूट असे असावे. पहिल्या साठ दिवसांपर्यंत पिकात रासायनिक कीडनाशकांची फवारणी घेऊ नये. पिकात आजूबाजूला मका, चवळी, भेंडी, एरंडी आदी सापळा पिकांची लागवड करावी. पांढरी माशी व अन्य किडींच्या समस्येसाठी जैविक कीडनाशकांचा उपयोग करावा. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा उपयोग करावा.’’

श्री. लोणाळे म्हणाले, ‘‘जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी ठिबक महत्त्वाची आहे. कारण,अति पाणी व खत वापराने जमिनीचे आरोग्य खराब झाले आहे. ठिबकच्या उपयोगाने पिकात उत्पादनवाढ साध्य करता येते. ठिबकमुळे वाफसा स्थिती कायम ठेवता येते. पिकाच्या

पांढऱ्या मुळांची चांगली वाढ यातून होते. खतांचा कार्यक्षम वापरही ठिबकने करता येतो.’’ श्री. अहिरे यांनी ‘रेवुलीस’ ठिबकची माहिती दिली. त्यात या ठिबकचे लाभ, वापर व अन्य मुद्दे त्यांनी सांगितले. ‘अॅग्रोवन’चे अजित वाणी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील रौंदळ यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT