Indra Mani Agrowon
ॲग्रो विशेष

Integrated Farming : एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा

Dr. Indra Mani : सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे वळावे. शेतकऱ्यांनी एकात्मिक शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

Team Agrowon

Nanded News : मातीतील सेंद्रिय घटक संपत आले आहेत. परंतु लागवड पद्धतीत बदल केल्यास पुन्हा आपली जमीन सुदृढ बनवू शकतो. यासाठी सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे वळावे. शेतकऱ्यांनी एकात्मिक शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे बुधवारी (ता. ७) आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. धर्मराज गोखले, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावार, कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. प्रीतम भुतडा, कोल्हापूर येथील उद्योजक गणपत पवार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदी उपस्थित होते.

डॉ. मणी म्हणाले, की कृषी पूरक उद्योगांची शेतकऱ्यांनी कास धरावी यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे. कृषी विज्ञान केंद्राने उभे केलेले प्रात्यक्षिक प्रकल्प वाखाणण्याजोगे आहेत. येथील प्रत्येक कोपरा शिकण्यासारखा असून, शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही, असेही ते म्हणाले.

दिलीप दमय्यावार यांनी नाबार्डाच्या विविध योजना व सेंद्रिय शेतीवर आधारित जीवा प्रकल्पाबद्दल माहिती दिली. प्रमोद देशमुख यांनी शेती उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सामूहिक शेती व तंत्रज्ञांचा अधिकाधिक वापर कसा करता येईल यावर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

डॉ. भुतडा म्हणाल्या, की बदलते हवामान व बिघडते आरोग्य यासाठी शेती व आहारात बदल करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वी सारखेच भरड धन्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ इत्यादी पिकांची लागवड आधुनिक पद्धतीने करावी यासाठी बीजप्रक्रिया व खताचे नियोजन करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast : ऑगस्टमध्ये कमजोर, सप्टेंबरमध्ये वाढणार जोर

Vidarbha Rain Alert : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT