Banana Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Insurance : नुकसानग्रस्त केळी बागांसाठी शेतकऱ्यांना विम्याचाच आधार

Khandesh Rain Update : खानदेशात मागील मार्च ते जून या कालावधीत पावसासह आलेल्या वादळात केळीची मोठी हानी झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात मागील मार्च ते जून या कालावधीत पावसासह आलेल्या वादळात केळीची मोठी हानी झाली आहे. ही हानी ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. पण शासनाकडून मदतीबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संभाव्य विमा योजनेतून मिळणाऱ्या भरपाईचाच आधार आहे.

जळगावातील जळगाव, जामनेर, रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, अक्कलकुवा, तळोदा या तालुक्यांमधील सुमारे साडेसहा हजार हेक्टरवरील केळी बागांची हानी झाली आहे. रावेर, मुक्ताईनगर, यावल भागात केळी काढणी, वाढीच्या अवस्थेत होती. मार्च व एप्रिलमध्ये काढणी सुरू होण्याची स्थिती होती.

जळगाव, जामनेर, चोपडा भागातही केळीची जोमात वाढ झाली होती. परंतु मार्च ते जून यादरम्यान खानदेशातील केळी पट्ट्याला वादळी पावसाचा मोठा फटका बसला. काही भागात तर सलग तीन दिवस वादळी पाऊस झाला. त्यात केळी भुईसपाट होऊन तिचे १०० टक्के नुकसान झाले.

प्रशासनालाही विविध टप्प्यात अनेक दिवस पंचनामे करावे लागले. यात नुकसानीची पातळी, वादळाची तीव्रता सतत वाढली. केळी पट्ट्यात यंदाही मोठे नुकसान झाले आहे. शासनानेही पंचनामे केले. परंतु शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर झालेली नाही. तसेच त्यासंबंधीचे आश्वासन मिळालेले नाही. पीकविमा योजनेतून पंचनामे झाले, परंतु हा निधी केव्हा मिळेल, किती मिळेल, याची माहिती केळी उत्पादकांना दिली जात नाही.

खर्च मोठा, पण मदत तुटपुंजी

केळीला एकरी किमान ६० हजार ते एक लाख रुपये खर्च येतो. काही शेतकरी एकरी सव्वा लाख रुपये खर्च करतात. हा खर्च वाढत आहे. यामुळे हेक्टरी ५ लाख रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कारण केळीचे झाड कोसळल्यानंतर ते पुन्हा उभे राहत नाही. त्यातून कुठलेही उत्पादन येत नाही. कोसळलेल्या झाडाचे घडही कुणी खरेदी करीत नाही. झाड फेकून द्यावे लागते. विमा योजनेतूनही कमी नुकसान विमा कंपनी दाखविते व अल्प मदत शेतकऱ्यांना देते.

पाहणी दौरे, आश्वासने

केळी पिकाबाबत राजकारणही करण्यात आले. अनेक नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांचा सपाटा मार्च ते जून या कालावधीत सुरू होता. लोकसभा निवडणुकीमुळे अनेक आमदार, लोकप्रतिनिधींनी धावती भेट आपल्या नजीकच्या क्षेत्रात दिली. आता केळी नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT