Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : रब्बीतील ३ लाख ६४ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच

Team Agrowon

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात या वर्षी (२०२३) रब्बी हंगामात मंगळवार (ता. १२) पर्यंत शेतकऱ्यांनी ४ लाख ९७ हजार ५८० विमा प्रस्ताव सादर केले आहेत. रब्बीतील ३ लाख ६४ हजार ५१३ हेक्टरवरील पिकांसाठी विमा कवच घेतले आहे.

पंतप्रधान पीकविमा योजना परभणी जिल्ह्यातील अधिसूचित मंडलातील ज्वारी, गहू (बागायती), हरभरा या पिकांना, तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी भुईमूग या पिकासाठी लागू आहे. रब्बी ज्वारीचे विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती.

तर गहू व हरभऱ्यासाठी शुक्रवार (ता. १५)पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येणार होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जनसुविधा केंद्र (सीएससी) तसेच पंतप्रधान पीकविमा योजनेचे पोर्टल याद्वारे विमा प्रस्ताव सादर केले.

मंगळवार (ता. १२) अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे ४ लाख ९९ हजार ४५६ विमाप्रस्ताव केले आहेत. त्याद्वारे ३ लाख ६५ हजार ४६६ हेक्टरवरील पिकांसाठी १ हजार ३४७ कोटी ४ लाख ६० हजार २८८ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे.

शेतकरी हिश्शाचा ४ लाख ९९ हजार ४५२ रुपये, राज्य व केंद्र शासनाच्या हिश्शाचा मिळून एकूण १५० कोटी ९ लाख ४९ हजार ७५१ रुपये एवढा विमा हप्ता आहे. उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२४ हि अंतिम मुदत आहे.

मंगळवार (ता.१२) पर्यंत उन्हाळी भुईमुगाचे १ हजार ८७६ प्रस्ताव दाखल करण्यात आले असून, ९५३ पिकासाठी ४ कोटी ९ लाख ६१ हजार ९२७ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे यांनी दिली.

पीकनिहाय विमा प्रस्ताव स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक विमा प्रस्ताव संरक्षित क्षेत्र

ज्वारी १५२६२१ ९७६५१

हरभरा २९७६३५ २४४१८०

गहू .४७३२४ २२६८१

उन्हाळी भुईमूग १८७६ ९५३

तालुकानिहाय पीकविमा प्रस्ताव स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका विमा प्रस्ताव संख्या विमा संरक्षित क्षेत्र

परभणी ८०२४८ ६८७४६

जिंतूर ८७३७४ ६२५५१

सेलू ५३३९२ ३८९५४

मानवत ३२५०८ २९४६७

पाथरी ३८७९७ ३०९५७

सोनपेठ २९५४९ २३६६३

गंगाखेड ६४५४७ ३८७४४

पालम ५२०४७ ३१२८७

पूर्णा ६०९९४ ४१०९६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT