Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेला विमा कंपनीचा आक्षेप

Crop Insurance Scheme : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन डव्हर्सिटी) या घटकानुसार अधिसूचना लागू केली होती.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन डव्हर्सिटी) या घटकानुसार अधिसूचना लागू केली होती. यामुळे विमा भरलेल्यांना शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु विमा कंपनीने जिल्हाधिकाऱ्याच्या अधिसूचनेवरच आक्षेप घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्वच मंडळांत अधिसूचना लागू होत नाही, यामुळे सरसकट अग्रिम देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. परंतु जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह कृषी विभागाने मात्र शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत सायंटिफीक डाटा सादर करत विमा कंपनीचा आक्षेप फेटाळला आहे.

जिल्ह्यात जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरिपातील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. अशा वेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या २५ टक्के अग्रिम रक्कम मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनास अधिसूचना काढण्याबाबत सूचना शासनाकडून दिल्या होत्या. यानुसार जिल्ह्यामध्ये समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले.

यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले होते. समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पिकाच्या उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन कापूस तूर व खरीप ज्वारी या पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन ॲडव्हर्सिटी) अधिसूचना ता. २८ सप्टेंबर रोजी लागू केली होती.

या अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील सर्वच ९३ महसूल मंडळांतील विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात २५ टक्के रक्कम अग्रिम विहित मुदतीत देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले होते.

यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळेल, असे वाटत असताना पीकविमा कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या अधिसूचनेवर आक्षेप घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात १९ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत विमा कंपनीने उपग्रहाद्वारे पीक पाहणीत नुकसान दिसले नाही, २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड नव्हता, पीक परिस्थिती चांगली होती, असे मुद्दे मांडत सर्वच मंडळांत अधिसूचना लागू करता येणार नाही, अशी भूमिका मांडली.

यांवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कंपनीचा आक्षेप फेटाळत कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सादर केलेली माहिती दिली. तसेच नुकसानीबाबत सांयटिफिक डाटा सादर केला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनीही पीक हिरवे दिसले म्हणजे उत्पादन चांगले येते, असे नसल्याचे सांगत पिकाच्या फुलोरा, तसेच फळधारणेच्या काळात पावसाचा खंड पडल्यामुळे शेंगामध्ये दाणे भरले राहील असे सांगत नुकसानीबाबत शेतकऱ्यांना अग्रिम द्यावा लागेल, असा युक्तिवाद केला.

यानंतर कंपनी अधिकाऱ्यांनी भरपाई देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत काही दिवसाचा अवधी मागितल्याची माहिती सूत्राने दिली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे २५ टक्के अग्रिम देण्याची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लागू केलेली अधिसूचना योग्य आहे. याबाबत कंपनीने त्यांची बाजू मांडली असलीतरी जिल्हा प्रशसनानेही शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत ठोस माहिती सादर केल्यामुळे विमा कंपनीला भरपाई द्यावी लागेल.
- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT