Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean MSP Procurement : महाराष्ट्रात सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी तयारी करण्याच्या सूचना; मध्य प्रदेशचा उल्लेख नाही

Anil Jadhao 

Pune News : नवे सोयाबीन बाजारात येण्याच्या ऐन तोंडावर सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. नव्या मालाची आवक वाढल्यानंतर बाजारभावावर आणखी दबाव येऊ शकतो. या काळात शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी सरकार हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार आहे. केंद्राय कृषी मंत्रालयाने महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी तयारी करण्याच्या सूचना नाफेड आणि एनसीसीएफला केल्या आहेत. यंदा सरकारने सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. 

महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्येही सोयाबीन खरेदीसाठी तयारीच्या सूचना दिल्या आहेत. कृषी मंत्रालयानेे ट्विटरवरून ही माहीती दिली. विशेष म्हणजे कृषी मंत्रालयाने केवळ महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्याचा उल्लेख केला. सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. तसेच देशात सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानाही उल्लेख करण्यात आलेला नाही. कर्नाटक आणि तेलंगणात सोयाबीन पीक कमी प्रमाणात घेतले जाते. 

पण महाराष्ट्रात तयारी करण्याच्या सूचना दिल्याने काहीसा दिलासा सोयाबीन उत्पादकांना मिळेल. कारण सध्या सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव पडल्याचा थेट परिणाम देशातील बाजारावरही झाला होता. देशात सोयाबीनचे भाव तर गेल्या १० वर्षातील निचांकी पातळीवर पोचले होते. पण आंतरराष्ट्री बाजारात सोयाबीनचे भाव सुधारल्यानंतर देशातही सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा झाली. पण आजही सोयाबीनचा भाव ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. 

विशेष म्हणजे सोयाबीनचा भाव ऐन नवा माल बाजारात येणाऱ्या तोंडावर कमी झालेला आहे. पुढील दोन-तीन आठवड्यांनंतर देशातील काही भागात सोयाबीनची आवक सुरु होईल. तर ऑक्टोबरपासून बाजारातील आवक वाढत जाईल. त्यामुळे भावावर आणखी दबाव येईल. त्यामुळे सरकारने बाजारात हस्तक्षेप करणे आवश्यक होते. अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी आणि राज्यात असलेल्या विधानसभा निवडणुका यामुळे सोयाबीन खरेदीच्या सूचना लवकर दिल्याची चर्चा आहे. पण बाजारात मालाची आवक सुरु होण्याच्या काळात खरेदी सुरु झाली तर बाजाराला सुरुवातीपासूनच हमीभावाचा आधार मिळेल. पण कृषी मंत्रालयाने आता केवळ सूचना केल्या आहेत. या सूचनेनुसार नाफेड आणि एनसीसीएफ प्रत्यक्ष खरेदी कधीपासून सुरु करणार? किती खेरदी केंद्रे सुरु करणार? हे महत्वाचे आहे. जर खरेदी वेळेत सुरु केली आणि खरेदी केंद्रे जास्त असतील तरचं या हमीभाव खरेदीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. 

सोयाबीन पिकाचे नुकसान

यंदा देशात आणि राज्यात सोयाबीनची पेरणी वाढली आहे. यामुळे सुरुवातीला उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जात होती. पण मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात पाऊस झाला. सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसला. नुकसान झाल्याने उत्पादनातही काही प्रमाणा घट येईल, असा अंदाज आतापासून व्यक्त केला जात आहे. पण नुकसानीची आकडेवारी पुढे आल्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल. 

हमीभाव परवडत नाही : शेतकरी

पण मुळातच आपल्या शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून उत्पादन कमी मिळते. त्यामुळे हमीभावाने खरेदी करूनही सोयाबीन परवडणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाने उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यापुढच्या काळात म्हणजेच काढण्याच्या काळातही पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नेमकं किती पीक हाती येईल, याची शाश्वती आताच नाही. त्यामुळे हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाला तर सोयाबीन पीक शेतकऱ्यांना परवडेल, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT