Soybean Producer: अलीकडेच बीड जिल्ह्यातील परळी येथील कृषी महोत्सवात सोयाबीन उत्पादकांना चांगला दर मिळावा, म्हणून त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं चौहान यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळं चौहान यांच्या भूमिकेकडे सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण आंदोलन अधिक तीव्र झालं तर मात्र सरकारची डोकेदुखी वाढू शकते. या आंदोलनाची धग महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात पोहचू शकते. कारण मध्यप्रदेश खालोखाल सर्वाधिक सोयाबिनचं उत्पादन महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात घेतलं जातं. आकड्यात सांगायचं झालं तर मध्यप्रदेशमध्ये ५२ लाख हेक्टर तर महाराष्ट्रात ४५ लाख हेक्टरवर सोयाबीनचं पीक घेतलं जातं. त्यामुळं मध्यप्रदेशच्या आंदोलनाची धग विदर्भ आणि मराठवाड्यातही पोहचू शकते. कारण महाराष्ट्रातील शेतकरी सोयाबीन दरामुळं हैराण आहेत. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लक्षात घेता सोयाबीनचे हमीभावाखालील दर महायुती सरकारच्या अंगलट येऊ शकतात. कारण निवडणुकीत इंगा दाखवू देऊ, अशी शेतकऱ्यांमध्ये सार्वत्रिक भावना आहे. केंद्र सरकारनं सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केलाय. पण सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार १०० ते ४ हजार २०० च्या दरम्यान दर मिळतोय. म्हणजेच हमीभावापेक्षा ७०० ते ८०० रुपये कमी दर शेतकऱ्यांना मिळतोय. सोयाबीन बाजारात मागील वर्षांपासून दराची पडझड सुरू आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं खाद्यतेल आयात शुल्क वाढवावं अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.