Tanaji Sawant Agrowon
ॲग्रो विशेष

Upsa Sinchan Yojana : कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेची मंत्री सावंतांकडून पाहणी

Minister of Public Health and Family Welfare Tanaji Sawant : कृष्णा-मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनेच्या करमाळा तालुक्यातील दहीगाव व मिरगव्हाण येथील कामाची पाहणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केली.

Team Agrowon

Solapur News : कृष्णा-मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनेच्या करमाळा तालुक्यातील दहीगाव व मिरगव्हाण येथील कामाची पाहणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केली. या अंतर्गत जेऊर ते मिरगव्हाण २७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम पुढील सहा महिन्यात पूर्ण करावे, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

यावेळी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बी. आर. शिंगाडे, कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे, धनंजय सावंत, बालाजी मुंजाळ, सतीश जैन व अन्य अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत योजना क्रमांक एक टप्पा एकच्या कामाविषयी सविस्तर माहिती आरोग्य मंत्री सावंत यांनी घेऊन जेऊर ते मिरगव्हाण बोगद्याच्या कामाची पाहणी केली.

या बोगद्याचे एकूण लांबी २७ किलोमीटर इतकी असून २४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन किलोमीटरचे कामही पुढील सहा महिन्यांत पूर्ण होऊन या बोगद्यातून उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर ओव्हर फ्लो होऊन जे पाणी बाहेर पडणार आहे, ते पाणी वाया जाऊ न देता या बोगद्यातून सीना नदीत सोडले जाणार आहे, असे मंत्री सावंत यांनी सांगितले.

तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पाची माहिती अधीक्षक अभियंता शेंडगे यांनी दिली. तसेच या बोगद्याचे उर्वरित तीन किलो मीटरचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या दहिगाव येथील काही शेतकऱ्यांचा सत्कार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Sugarcane Protest: कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटले, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Sugarcane Crushing Season: ‘द्वारकाधीश’चे ६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Rabi Sowing: अहिल्यानगरमध्ये रब्बी पेरणी दहा टक्के

Cotton Procurement: शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा

Poultry Exports: पोल्ट्री निर्यातीत दुपटीने वाढ, भारतीय अंड्यांना जगभरातून मोठी मागणी, युएई ठरला सर्वात मोठा खरेदीदार

SCROLL FOR NEXT