Dr. Pravin Gedam Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Orchard : कृषी आयुक्तांकडून निर्यातक्षम डाळिंब बागांची पाहणी

Dr. Pravin Gedam : राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे नुकतेच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी गौडवाडी (ता. सांगोला) येथील शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम डाळिंब बागांना भेटी दिल्या.

Team Agrowon

Solapur News : राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे नुकतेच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी गौडवाडी (ता. सांगोला) येथील शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम डाळिंब बागांना भेटी दिल्या. तसेच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांच्या अडचणीसंबंधी संवादही साधला.

डाळिंब पिकामध्ये वापरले जाणारे क्रॉपकव्हरच्या (नेट) अनुदानामध्ये बदल व्हावा, अशी मागणी या वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली. गौडवाडीमधील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीमध्ये प्रावीण्य मिळवून तयार केलेल्या डाळिंब पॅटर्नविषयी कृषी आयुक्त डॉ. गेडाम यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले.

या वेळी नरेगा अंतर्गत डाळिंब फळबाग लागवड, ठिबक सिंचन, बायोगॅस व स्लरी युनिट त्याचबरोबर यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व फवारणीसाठीच्या ब्लोअरची पाहणी केली.

त्यानंतर बामणी गावामध्ये चिकू व ड्रॅगन फ्रूट फळपिकाची पाहणी करून शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. या वेळी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाइकवाडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मदन मुकणे, उपविभागिय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Innovation: अमेरिकेतील फळबागेत ‘पीक युवर ओन’ उपक्रम

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून परतीच्या मार्गावर

Sugarcane Rate: ‘माळेगाव’चा अंतिम दर ३४५० रुपये 

Congress Campaign: परवडणाऱ्या घरांसाठी काँग्रेसचे अभियान

Fadnavis Relief Package: फडणवीसांचे सरकारी पॅकेज म्हणजे फक्त आकड्यांची हेराफेरी

SCROLL FOR NEXT