Sugarcane : ऊस पाचट व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आता बक्षीस

Suagrcane Farmer : स्पर्धांमध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी सहाय्यक तानाजी पाटील यांनी केले.
Sugarcane
Sugarcaneagrowon
Published on
Updated on

Sugarcane Plantation Management : भविष्यात शेतीसाठी कमी पडणारा पाण्याचा स्रोत व मशागतीच्या खर्चात शेतकऱ्यांची बचत व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी उसाचे पाचट न जाळता ते एक आड एक सरीत ठेवावे अशा पद्धतीच्या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन केले आहे.

या स्पर्धांमध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन वडणगे (ता. करवीर) येथील कृषी सहाय्यक तानाजी पाटील यांनी केले.

तानाजी पाटील यांनी पाचटामुळे भांगलण मशागत खर्चात व श्रमात बचत होते तसेच शेतात सतत ओलावा राहून मुळांची भरपूर वाढ होते. जमिनीत गांडुळांची नैसर्गिक वाढ होऊन जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.

सेंद्रिय खतामुळे रासायनिक गुणधर्म वाढून जलसंधारण शक्ती वाढते सर्वसाधारणपणे एकरातून चार ते पाच टन पाचट मिळते व त्यापासून दोन ते तीन टन सेंद्रिय खताचा त्या शेतीस उपयोग होतो त्यामुळे एकरी चार ते सहा टनांनी उत्पादन वाढ निश्चित मिळणार असल्याचे सांगितले.

Sugarcane
Sugarcane Harvesters : सरकारची फक्त घोषणाच ऊस तोडणी यंत्रधारकांना अद्यापही अनुदानाची प्रतीक्षा

या उपक्रमाविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी कृषि सहाय्यक तानाजी पाटील यांनी लकी ड्रॉ आयोजित केला असून, यामध्ये भाग घेण्यासाठी सन २०२३-२०२४ मध्ये खोडवा पिकात एक सरी आड पाचट ठेवणे आवश्यक आहे.

या योजनेत भाग घेणाऱ्या वडणगे, आंबेवाडी येथील खातेदारांनी वडणगे विकास सेवा संस्थेमध्ये चालू तारखेचा ८ अ उतारा (झेरॉक्स) जमा करावे तसेच या स्पर्धेतील विजेत्यांसाठी अनुक्रमे रु. ७००१, ५००१ व ३००१ अशी बक्षिसे रोख स्वरूपात देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com