Water Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करा

Water Update : यंदाच्या मॉन्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याची गुणवत्तेबाबत दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासण्या येत्या २० जून २०२३ पर्यंत पूर्ण करून घ्याव्यात.

Team Agrowon

Solapur Water News : यंदाच्या मॉन्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याची गुणवत्तेबाबत दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासण्या येत्या २० जून २०२३ पर्यंत पूर्ण करून घ्याव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांची मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासणी येत्या २० जून २०२३ पर्यंत पूर्ण करून घ्याव्यात. या अंतर्गत पाणी गुणवत्तेच्या पोर्टलवर पाणीपुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळ जोडणी असलेली कुटुंबे इ. स्रोतांचे पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी गोळा करून पाणी नमुने गुणवत्ता पोर्टलवर यूआयडी काढूनच संबंधित उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करावेत.

या पाणी गुणवत्ता तपासणी अभियानासाठी विस्तार अधिकारी पंचायत यांची नोडल अधिकारी व विस्तार अधिकारी आरोग्य यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवताना कॅनवर पाणी नमुन्याचा पाणी गुणवत्ता पोर्टलवरील नोंदीचा संकेतांक असणे गरजेचे आहे.

आगामी पावसाळ्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊन साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून सर्व ग्रामपंचायतींनी उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, योग्य पद्धतीने नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करून पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा, तसेच लोकांमध्येही याबाबत जनजागृती करावी.
ईशादिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, दर तीन महिन्यांतून एकवेळा करणे गरजेचे आहे. सध्या ग्रामपंचायतींनी येत्या ५ जून २०२३ पर्यंत टाक्यांची स्वच्छता करून घ्यावी.
सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT