Crop Insurance Company Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Company : ‘एचडीएफसी ॲग्रो’च्या पंचनाम्यांची चौकशी करा

HDFC Agro General Insurance Company : एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या २०२१ मधील पंचनाम्यांची समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. अन्यथा, या कंपनीला २०२३- २०२४ चे कंत्राट देऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Team Agrowon

Akola News : एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या २०२१ मधील पंचनाम्यांची समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. अन्यथा, या कंपनीला २०२३- २०२४ चे कंत्राट देऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

याबाबत संघटनेने सोमवारी (ता. ३) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीला २०२१ मध्ये अकोला जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेचे कंत्राट मिळाले होते.

या कंपनीने अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले नाहीत. तर काही शेतकऱ्यांचे केले तसेच कंपनीने बोगस पंचनामे दाखवून कमी टक्केवारी दाखवली होती. शेतकऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या त्या पंचनाम्यावर खोट्या स्वाक्षऱ्या मारून शासनाची दिशाभूल केली.

शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार गंभीर असून, समिती गठित करून चौकशी केली जावी. या समितीमध्ये एक शेतकरी, एक पत्रकार तसेच काही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नेमावी.

पंचनामा अर्जाची फेर तपासणी करावी. ज्या अर्जात त्रुट्या असतील किंवा बोगस सह्या असतील त्या शेतकऱ्यांना नुकसान १०० टक्के नुकसान भरपाई देण्यात यावे. जर कंपनी देत नसेल तर २०२३- २४ चे कंत्राट देऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. शिवाय या मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

राज्याचे कृषीमंत्री, कृषी आयुक्त, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय सोनोने, चंद्रशेखर गवळी, रामहरी आगळे, केशव लढे, संजय गालट, शेख मुख्तार, आशिष बोरसे, मंगेश भातुलकर, शेख मोहसीन, हरिदास गवळी, गणेश ठक, अविनाश अव्हाळे, राजू पठाडे आदींनी हे निवेदन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT