Banana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Insurance : फळ पीकविमा योजनेत केळी विमाधारकांवर अन्याय

Fruit Crop Insurance Scheme : हवामानाची माहिती घेण्यासाठी हवामानमापक विविध महसूल मंडलांत कार्यरत केली आहे.

Team Agrowon

Jalgaon News: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी विमाधारक शेतकऱ्यांना सदोष हवामानमापक यंत्र व हवामानाच्या चुकीच्या माहितीमुळे थंडी व अधिक तापमान यासंबंधीच्या नुकसान भरपाई किंवा परताव्यांपासून वंचित राहावे लागेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

फळ पीकविमा योजनेत २०२३-२४ च्या हंगामात जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार केळी उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. या योजनेची कार्यवाही हवामान म्हणजेच तापमान, वारा, गारपीट याबाबतच्या नोंदी, माहिती यानुसार विमा कंपनी करते. केळी पिकाला कमी व अधिक तापमान, वेगाचा वारा आणि गारपीट या समस्यांबाबत विमा संरक्षण आहे.

हवामानाची माहिती घेण्यासाठी हवामानमापक विविध महसूल मंडलांत कार्यरत केली आहेत. एका खासगी कंपनीकडून हवामानमापक केंद्रांचे संचलन केले जाते. याच कंपनीकडून हवामानाची माहिती (डाटा) विमा कंपनी, शासन घेते व त्यानुसार परतावे देणे, नुकसान भरपाई देणे याची कार्यवाही केली जाते.

परंतु जिल्ह्यात बसविलेली हवामानमापक यंत्रे सदोष असल्याने अनेक महसूल मंडलांतील शेतकरी कम तापमान (थंडी) व अधिक तापमानासंबंधीच्या परताव्यांपासून वंचित राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, याबाबत यावल येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, की विमा कंपनी ज्या हवामानमापक केंद्रांकडून माहिती घेऊन विमा नुकसान भरपाई देते ती हवामानमापक यंत्रे कुठे आहेत, याची माहिती शेतकऱ्यांना नाही.

अनेक भागांत हवामानमापक केंद्रांची दैना झाली आहे. त्याभोवती वृक्ष, काटेरी झुडपे, आडोसा आहे. यामुळे तापमान, थंडी, वारा याच्या नेमक्या, अचूक नोंदी होत नाहीत. यामुळे यावल तालुक्यातील केळीविमाधारकांना अधिक तापमानाच्या भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. निवेदन देताना मुकेश येवले, जगदीश कवडेवाले, अतुल पाटील, डी. पी. साळुंखे आदी उपस्थित होते.

पिंप्रळासह अन्य मंडलांवरही अन्याय थंडी किंवा कमी तापमानाच्या नुकसान भरपाईसाठी जळगाव तालुक्यातील भोकर व म्हसावद ही महसूल मंडले पात्र ठरली आहेत. परंतु जळगाव तालुक्यातील पिंप्राळा, आसोदा, नशिराबाद ही महसूल मंडले थंडीच्या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेली नाहीत. दोन महसूल मंडलांतील एअर डिस्टन्स फारसे नाही.

तरीदेखील पिंप्राळा व अन्य महसूल मंडलांतील हवामानमापक केंद्रांत थंडीच्या किंवा कमी तापमानाच्या वेगवेगळ्या नोंदी कशा झाल्या, असा प्रश्न जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द, फुपनगरी, कानळदा, नांद्रा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. थंडीच्या नुकसान भरपाईसंबंधी जिल्ह्यातील फक्त ३६ महसूल मंडलांतील केळीविमाधारक शेतकरी पात्र ठरले आहेत.

यासंबंधी कृषी विभाग, विमा कंपनीने योग्य ती कार्यवाही करून पिंप्राळा, आसोदा, नशिराबाद ही महसूल मंडलेही थंडीच्या नुकसान भरपाईसाठी पात्र घोषित करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT