Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Agristack Scheme : प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ॲग्रिस्टॅक योजनेची माहिती पोहोचवावी

Digital Agriculture : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे.

त्या अनुषंगाने जिल्ह्यात ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने या योजनेची माहिती तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ॲग्रिस्टॅक योजनेच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, तहसीलदार श्रीकांत पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की केंद्रशासन ही योजना राबवत असून, राज्य शासनाने ही कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक जलद सुविधा देण्यासाठी ॲग्रिस्टॅक ही योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरीत्या तयार करणे व तो सातत्याने अद्ययावत करणे या बाबी अंतर्भूत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी ॲग्रिस्टॅक या योजनेविषयी माहिती दिली.

त्यानंतर बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी ॲग्रिस्टॅक योजना बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने राबविण्यात आली. तसेच ही योजना काय आहे व प्रत्यक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये कशा पद्धतीने कामकाज करावयाचे आहे याविषयीची अत्यंत सविस्तर माहिती ऑनलाइनद्वारे दिली.

१६ डिसेंबरपासून मिशनमोडवर काम

प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी अत्यंत कार्यक्षमपणे पार पाडून कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी व्हावा, यासाठी आवश्यक असलेली माहिती अत्यंत बिनचूकपणे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ॲप मध्ये भरावी, असे निर्देश ही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. ही योजना संपूर्ण राज्यात १६ डिसेंबरपासून मिशन मोडवर सुरू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT