Dudhana Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Dudhana Dam: निम्न दुधना प्रकल्पात ८ दलघमी पाण्याची आवक

Water Stock Update: जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात आठ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. दरम्यान, भर उन्हाळ्यात दुधनेत पाणी येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

Team Agrowon

Jalana News: सरत्या मेमध्ये पूर्वमोसमी पावसाने कहर केला असून, दररोज विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात आठ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. दरम्यान, भर उन्हाळ्यात दुधनेत पाणी येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर निम्न दुधना प्रकल्पात झपाट्याने पाण्याची आवक सुरू होते. साधारणतः जुलैपासून दुधना प्रकल्पात पाणी येते. परंतु, ८ मे पासून सतत अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहले. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातही पाण्याची आवक सुरू झाली आहे.

प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या असंपादित जमिनीवर प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा केल्यानंतर पाणी साचून पिकाचे नुकसान होत असल्यामुळे प्रकल्पात तीन वर्षांपासून ७५ टक्के जलसाठा ठेवला जात आहे. गतवर्षी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा ठेवून उर्वरित पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते.

प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांत २१ दिवसांच्या अंतराने रब्बी हंगामातील पिकांसाठी दोन्ही कालव्यांतून तीन आवर्तने देण्यात आली होती. तसेच, उन्हाळी पिकांना दोन पाणी आवर्तने सोडण्यात आली.

निम्न दुधना प्रकल्पामध्ये यंदा मेमध्ये झालेल्या पावसामुळे ८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्याचा आगामी काळात फायदा होणार आहे. जिल्ह्यात सतत पाऊस पडत असल्याने प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच मे मध्ये पाणी आवक सुरू झाल्याचे पाहवयास मिळत आहे.

अतिरिक्त भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

सदरील प्रकल्पालगत असणाऱ्या बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून या प्रश्नांना वेळोवेळी बगल दिली गेल्याने बाधित शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे अतिरिक्त भूसंपादनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश राजबिंडे यांनी केली.

यंदाही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरेल का?

निम्न दुधना प्रकल्प १०० टक्के भरल्यास लगतच्या संपादित क्षेत्रात पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने ७५ टक्के पाणीसाठ्याची अट घालण्यात आली आहे. मागील वर्षी प्रकल्पातील पाणीसाठा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने अनेकवेळा पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करावा लागला होता. यंदादेखील तीच परिस्थिती राहील, असा अंदाज जाणकारांकडून वर्तवला जात

१४५ मिलिमीटर पावसाची नोंद

दुधना प्रकल्प क्षेत्रात मे महिन्यात आजपर्यंत १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षी मे महिन्यात दुधना प्रकल्प मृतसाठ्यात होता. दरम्यान, सेलू शहरासह विविध ग्रामीण भागातील गावांमध्ये या दुधना प्रकल्पातून शेतीला पाणी सोडण्याचे नियोजनसुद्धा केले जाते. त्यामुळे यंदा या पाण्याचा अधिकाधिक वापर शेतकऱ्यांना करता आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT