RBI Report  Agrowon
ॲग्रो विशेष

RBI Report : देशातील महागाई दर कमी होणार; रब्बी उत्पादन वाढीचा आरबीआयचा अंदाज 

Kharif Season : खरीप पिकांची आवक बाजारात सुरू झाली आहे. यंदाच्या खरीपात पिकांचं उत्पादन चांगलं झालं आहे. त्याचबरोबर मॉन्सून हंगामातील पावसामुळं आता रब्बीतही चांगल्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Dhananjay Sanap

Pune News : खरीप पिकांची आवक बाजारात सुरू झाली आहे. यंदाच्या खरीपात पिकांचं उत्पादन चांगलं झालं आहे. त्याचबरोबर मॉन्सून हंगामातील पावसामुळं आता रब्बीतही चांगल्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी भारतात अन्नधान्य महागाई दर आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कमी होण्याची अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने व्यक्त केला आहे.

तर देशातील अन्नसुरक्षा सुरक्षित ठेवण्यासाठी धान्याचा बफर साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं आरबीआयनं अहवालात सांगितलं आहे. तर जमिनीतील ओलावा, पुरेशी थंडी आणि जलसाठयातील पाण्यासाठामुळे रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाचा दावा आरबीआयने केला. 

हिरव्या भाज्या आणि डाळीसह खाद्यपदार्थाच्या वाढत्या किमतीमुळं सप्टेंबर महिन्यात अन्नधान्य महागाई दर ४ टक्क्यानी वाढू ९.२४ पोहचला आहे. त्याचं कारण म्हणजे देशातील विविध भागात मॉन्सून हंगामात जोरदार पावसानं लावलेली हजेरी असल्याचं बोललं जात आहे. सध्या खरीप पिकांची काढणी करून नवीन पीक बाजारात दाखल होऊ लागलं आहे. 

आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीनं खरीप पिकांच्या पेरणीत गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ नोंदवली आहे. तसेच देशभरातील एकूण खरीप पिकांखालील क्षेत्र १ हजार ८८ लाख हेक्टरवरून १ लाख १०४ लाख हेक्टरपर्यंत वाढल्याचं सांगितलं. परंतु यंदाच्या खरीप हंगामात विविध क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

तसेच पुरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागातही खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी उत्पादनातील घटीमुळे महागाई वाढल्याचं बोललं जात होतं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशातील विविध राज्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे किड आणि रोगांचा पिकावर प्रादुर्भावही वाढला होता. हिमाचल आणि उत्तर प्रदेशातील टोमॅटो आणि बटाटा पिकाला झटका बसला.

सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२४ मध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर ९.२४ टक्क्यांपर्यंत वाढला. तर ऑगस्टमध्ये अन्नधान्य महागाई दर ५.६६ टक्के आणि जुलैमध्ये ५.४२ टक्के होता. ऑगस्ट आणि जुलैच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये अन्नधान्य दर सुमारे ४ टक्क्यांनी वाढला. तसेच सप्टेंबर महिन्यात ग्रामीण आणि शहरी भागात अन्नधान्याच्या महागाई दराने मोठी मजल मारली होती. ऑगस्ट महिन्यात ग्रामीण भागात ६.०२ टक्के सप्टेंबर महिन्यात ९.०८ टक्के पोहचले होते. तर ऑगस्ट महिन्यात शहरी भागात महागाई दर ४.९९ टक्क्यावरून सप्टेंबर महिन्यात ९.५६ टक्क्यावर पोहचला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : शेतीपूरक विविध योजनांचा लाभ घ्या

Cooperative Bank Award : अकोला-वाशीम जिल्हा बँकेला पुरस्कार

Electricity Connection : मराठवाड्यात वर्षभरात सव्वा लाख नवीन वीज जोडण्या

Water Crisis Maharashtra : मराठवाड्यातील ११ लघू प्रकल्प अजूनही कोरडे

Green Revolution: शेतकऱ्यांनी उभे केले घनदाट जंगल...

SCROLL FOR NEXT