Soybean Seed Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed : सोयाबीन बियाण्याची महागाई, हमीचा अभाव

Team Agrowon

Jalgaon News : खरीप हंगाम सुरू होत असतानाच सोयाबीन बियाण्याची महागाई, या बियाण्याच्या उगवणीबाबतच्या हमीचा अभाव आणि अधिक मागणी असलेल्या वाणांचा किंवा बियाण्याचा तुटवडा यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. सोयाबीन पेरणी वाढेल, असा अंदाज आहे. पण दुसरीकडे बियाण्याबाबतच्या समस्या यंदा अधिक डोकेदुखी ठरत आहेत.

कृषी विभाग फक्त आवाहन, सूचना करीत आहे. त्यापुढे काहीही उपाय बियाणे टंचाई, हमीच्या तक्रारींवर कृषी विभागाने केलेल्या नाहीत. यामुळे समस्या आणखीच किचकट होत आहे. एका कंपनीचे ३० किलोचे बियाणे ३५०० रुपयांत, तर दुसऱ्या एका कंपनीचे ३० किलोचे बियाणे ४२०० रुपयात, असे वेगवेगळे दर आहेत.

लवकर येणारा वाण, काळ्या कसदार जमिनीत कमी पाण्यात तग धरणारा वाण असे वेगवेगळे प्रकार सांगून बियाण्याची विक्रीही सुरू आहे. काही कृषी केंद्रचालक भूलथापाही देत आहेत. पण यात बियाण्याची उगवण क्षमता व पुढे भरपाई यातून कृषी केंद्रचालक, कंपन्या आपला बचाव करून घेत आहेत.

कशाची कुणीच हमी देऊ शकत नाही, बियाणेच नाही, अशी बतावणी कृषी केंद्रचालक करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे वित्तीय शोषणच जणू यंदा बियाणे बाजारात सुरू असल्याची स्थिती आहे. काही वाणांची अधिक मागणी असल्याने त्यांची टंचाई बाजारात आहे. त्यासाठी शेतकरी कृषी केंद्रात दर दोन-तीन दिवसांत चकरा मारीत आहेत.

राज्य शासनाची बियाणे संस्था म्हणजेच ‘महाबीज’चे बियाणे बाजारात दाखल झाले आहे. त्याची मागणीदेखील आहे. पण उगववणीसंबंधी गेल्या वर्षासारख्या तक्रारी वाढायला नकोत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहे. सोयाबीनची पेरणी यंदा वाढणार आहे, असा अंदाज आहे.

खानदेशात जळगाव जिल्ह्यात किमान २६ ते २८ हजार हेक्टरवर पेरणी होईल. तर धुळे व नंदुरबारात मिळून ११ ते १२ हजार हेक्टरवर पेरणी शक्य आहे. कारण सोयाबीनचे दर गेले सात ते आठ महिने टिकून आहेत. शासन पुरेसा सोयाबीन पुढे उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे, पण बियाण्याची टंचाई व महागाई आदी समस्यांमुळे या प्रयत्नांमध्ये अडचणी येताना दिसत असल्याचा मुद्दा चर्चेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT