Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Joint Director of Agriculture Sahebrao Diwekar : प्रत्येक गावातील कृषी सहायकांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी. गावागावांत सोयाबीन बियाणे उगणशक्ती प्रात्यक्षिके करून दाखवावीत, असे निर्देश लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी दिले.
Joint Director of Agriculture Sahebrao Diwekar
Joint Director of Agriculture Sahebrao Diwekar Agrowon

Parbhani News : उत्पादन खर्च कमी करण्यासाठी स्वतःच्या घरच्या सोयाबीन बियाण्याची उगणशक्ती तपासूनच पेरणीसाठी वापरावे लागेल. त्याअनुंषगाने प्रत्येक गावातील कृषी सहायकांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी. गावागावांत सोयाबीन बियाणे उगणशक्ती प्रात्यक्षिके करून दाखवावीत, असे निर्देश लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी दिले.

परभणी जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गतीळधान्य) २०२४-२५ अंतर्गत विस्तार कर्मचारी, अधिकारी यांचे प्रशिक्षण बुधवारी (ता. १५) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या वेळी दिवेकर बोलत होते.

Joint Director of Agriculture Sahebrao Diwekar
Soybean Seed Processing : सोयाबीन बीज प्रक्रियेवर जोर

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी, आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी रवी हारणे, प्रकल्प उपसंचालक संजय गायकवाड, जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले, जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृद्‍ चाचणी अधिकारी प्रमोद घुले, तंत्र अधिकारी (जेडीए लातूर) उल्हास राक्षे, तंत्र अधिकारी (सांख्यकी) महादेव लोंढे, कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ दिगंबर पटाईत, विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे आदींची उपस्थिती होती.

दिवेकर म्हणाले, की येत्या खरीप हंगामात शंखी गोगलगाय, सोयाबीनवरील येलो मोझॅक, तुरीवरील मर रोग, कपाशीवरील बोंड आळी नियंत्रण उपाययोजनांचा गावागावांत प्रचार व प्रसार करावा. क्षेत्रीय तसेच कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कामे करावीत. कृषी विभागाच्या विविध योजना वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत दिलेला लक्षांक पूर्ण करावा.

Joint Director of Agriculture Sahebrao Diwekar
Soybean Seeds : स्वतःचे सोयाबीन बियाणे वापरा

या वेळी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मृदा नमुने संकलनासाठी निवड झालेल्या गावातील कृषी सहायक यांना मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे (गंगाखेड), आबासाहेब देशमुख (पालम), प्रदीप कच्छवे(जिंतूर), शेराण पठाण (सेलू), गोविंद कोल्हे (पाथरी), योगेश नीलवर्ण (परभणी),

रघुवीर नाईक (मानवत), जयदीप गिराम (सोनपेठ), संतोष भालेराव (पूर्णा) यांनी तालुक्यातील खरीप हंगाम नियोजन सादरीकरण केले. मंडळ कृषी अधिकारी (पिंगळी), शीतल पौळ, कृषी पर्यवेक्षक (चिकलठाणा), बलभी आवटे, कृषी सहाय्यक, गजानन राठोड यांनी सादरीकरण केले. रामकृष्ण रेंगे यांनी तूर पीक लागवड तंत्र व्यवस्थापनावर माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com