Snails Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Snails Issue : वरूड बगाजी गावात गोगलगायींचा प्रादुर्भाव

Snails Update : धामणगाव रेल्वे तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणाजवळ असलेल्या वरूड बगाजी येथील ग्रामस्थ गोगलगायींमुळे त्रस्त झाले आहेत.

Team Agrowon

Amravati News : धामणगाव रेल्वे तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणाजवळ असलेल्या वरूड बगाजी येथील ग्रामस्थ गोगलगायींमुळे त्रस्त झाले आहेत. शेतात, प्रत्येक घरी, दारोदारी गोगलगायींचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान, कीटकनाशके वापरून सुद्धा गोगलगायींचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.

वरूड बगाजी गावात घरोघरी गोगलगायी निघत आहेत. शेतांतून गोगलगायींनी शिरकाव केला. परंतु आता तर पूर्ण गावातच रस्त्याने, भिंतीवर, झाडावर व जिकडे तिकडे गोगलगायी झाल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. आता कीटकनाशके वापरून सुद्धा गोगलगायींचे प्रमाण काही कमी झाले नाही. यासाठी काय उपाय करावे काही समजत नाही, असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे. या गोगलगायींमुळे सर्व जण त्रस्त झाले आहेत.

सुरवातीला काही घरांत गोगलगायींनी शिरकाव केला. परंतु आता तर पूर्ण गावातच रस्त्याने, भिंतीवर, झाडावर जिकडे तिकडे गोगलगायीच आहेत.
आशिष जगताप, वरूड बगाजी
वरूड बगाजी गावाला गोगलगायींनी अक्षरश: गावाला वेढा घातला असून, शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. रात्री शेतकरी शेतात जाऊन गोगलगायी वेचत आहेत. सर्वत्र त्यांचा वावर आहे. कृषी, आरोग्य विभाग व प्रशासनाने लक्ष द्यावे.
बाबूलाल खडसे, वरूड बगाजी
जगातील सर्वांत घातक किडींमध्ये क्रमांक दोनची ही घातक कीड आहे. या गोगलगायी रात्रीच्या वेळी पानांना, फुलांना मोठ्या आकाराची छिद्रे पाडून पानांच्या कडा खातात. यामुळे पिकांचे नुकसान होते.
सुजित मुंदडा, आम्ही बालाजी फाउंडेशन
शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत कीटकनाशक तालुका कृषी कार्यालयात उपलब्ध आहे. तरी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
प्रशांत गुल्हाने, तालुका कृषी अधिकारी, धामणगाव रेल्वे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT