Soybean Crop Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Humani Pest Issue : सोयाबीन पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव

Agriculture Department : किडीचे तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच नियंत्रण करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केद्र व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Team Agrowon

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यातील काही भागांत सोयाबीन पिकात हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. किडीचे तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच नियंत्रण करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केद्र व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कृषी विज्ञान केंद्राच्या कीड सर्वेक्षणात सोयाबीन पिकात हुमणी किडीचा प्रादुर्भाव चिखली तालुक्यातील काटोडा, अमोना, चंदनपूर, अंत्री या गावांत आढळून आला आहे. किडीची अळी जमिनीत राहून पिकांच्या मुळावर हल्ला करून उपजीविका करते.

त्यामुळे झाडे वाळतात. जिल्ह्यामध्ये कमी पाऊस आहे आणि हलकी जमीन आहे, अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

नियंत्रणासाठी सद्यःस्थितीत करावयाच्या उपाययोजनेत मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक कीटकनाशकाचा किंवा शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्‍ज्ञ कीटकशास्त्र प्रवीण देशपांडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. ए एस. तारू यांनी याबाबत आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT