Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : भातशेतीला औद्योगिकीकरणाचा फटका

Panvel Industrialization : जेएनपीए, आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, औद्योगिक विकास संस्थांमुळे पनवेल आणि उरण तालुक्यात जमिनी संपत चालल्या आहेत.

Team Agrowon

Panvel News : जेएनपीए, आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, औद्योगिक विकास संस्थांमुळे पनवेल आणि उरण तालुक्यात जमिनी संपत चालल्या आहेत. चार वर्षांपू्र्वी २०२१मध्ये पनवेलमध्ये १२ हजार हेक्टर होती. २०२२ मध्ये आठ हजार हेक्टर, २०२३ला सात हजार हेक्टर; तर २०२४ला हेच प्रमाण पाच हजार ९९९ हेक्टरवर आले आहे. त्यामुळे पनवेल तालुक्याचा शंभर टक्के असलेला पीकपेरा आठ टक्क्यांवर आला आहे.

मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या आणि झपाट्याने विकसित होत असलेल्या पनवेल, उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण व औद्योगिकीकरण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणची शेती आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. या कारणाने भाताचे कोठार म्हणून पूर्वी असलेली ओळख हळूहळू पुसू लागली आहे.

पनवेल, उरण आणि ठाणे जिल्ह्यातील ९५ गावांची जमीन संपादित करून त्या ठिकाणी सिडकोने नागरी वसाहती विकसित केल्या. तत्पूर्वी या ठिकाणी भाताची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. भाताचे कोठार म्हणून या दोन्ही तालुक्यांची वेगळी ओळख होती.

येथे भात गिरण्याही मोठ्या प्रमाणात होत्या. त्याचबरोबर बंदर असल्याने येथून तांदळाची ने-आण केली जात असे. भातशेतीसाठी येथील जमीनही अनुकूल होती.मात्र सद्यःस्थितीत ही आकडेवारी पाच हजार हेक्टरपर्यंत खाली आली आहे.

पिकत्‍या जमिनींवर व्यावसायिकांचा डोळा

पनवेल हे एमएमआरडीएमध्ये येत असल्याने सुकापूर, कसळखंड, पळस्पे आणि भोकरपाडा, ठोंबरेवाडी, पोयंजे येथे मोठमोठे टाऊनशिप उभारण्यात आले आहेत. येथेसुद्धा हजारो एकर पिकत्या जमिनी बांधकाम व्यावसायिक कंपन्यांनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेतीवर त्याचा परिणाम झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Report: साखर कारखान्यांकडून आतापर्यंत २० लाख ३४ हजार टन उसाचे गाळप

Zendu Sathwan Kalaji: बदलत्या वातावरणात चांगला बाजारभाव मिळवण्यासाठी झेंडूचे व्यवस्थापन

Women Self Help Group Business: महिला बचत गटांच्या उत्पादनांना दिवाळी महोत्सवातून बाजारपेठ

Dam Water Distribution: पुणे जिल्ह्यातील धरणांतून ३२ टीएमसी पाण्याचा वापर

Centre Sugar Policy: केंद्राच्या साखर धोरणावर शेतकरी संघटनांची टीका; ऊस उत्पादकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक

SCROLL FOR NEXT