Indrayani River Agrowon
ॲग्रो विशेष

Indrayani River Pollution : पुन्हा एकदा इंद्रायणी फेसाळली; आळंदीकर आणि वारकऱ्यांच्या मागणीला यश नाहीच

Indrayani River : वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. यामुळे आळंदीकर आणि वारकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आळंदीमध्ये इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मध्यंतरी तत्कालिन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणीच्या प्रदुषणावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच नदी प्रदुषणमुक्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर काही प्रमाणात नदीचे फेसाळणे थांबले होते. पण पुन्हा आता नदी फेसाळल्याने वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे आळंदीकर आणि वारकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हिमालयातील बर्फ की इंद्रायणी?

इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून पुन्हा एकदा इंद्रायणी फेसाळली आहे. आज देखील नदीच्या पाण्यावर पांढरा शुभ्र बर्फासारखा तवंग जमा झाला आहे. यामुळे बघ्यांकडून ही इंद्रायणी नदी आहे की हिमालयातील बर्फ असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिंदेंचे आश्वासन हवेतच विरले

२९ जून २०२४ रोजी अलंकापुरीत शिंदे यांनी पालखी सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील वारकऱ्यांची आपल्याला काळजी असून इंद्रायणीच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनानंतर पहिल्याच २४ तासांत इंद्रायणी फेसाळली होती. ज्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पावले उचलल्याचा आव आणला होता. पण नदी वारंवार फेसाळत असल्याने नदीची अवस्था जैसे थे असल्याचं पाहायला मिळत आहे.

तर शिंदे यांची भेट आणि त्यांचे आश्वासन फक्त वेळ मारून नेण्यासाठी होती का? प्रशासनान फक्त आदेश मानून तात्पूरती मलमपट्टी तर कर नाही ना? असे सवाल आता आळंदीकर आणि वारकऱ्यांकडून केला जात आहे.

वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात

आळंदीकर आणि वारकऱ्यांकडून इंद्रायणी नदीत पवित्र स्नान केले जाते. पण गेल्या कित्येक महिन्यापासून इंद्रायणीत प्रदुषण होत आहे. यावरून इंद्रायणी नदी काठावर आंदोलने देखील झाली आहे. मात्र आता इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून वारकऱ्यांच आरोग्य धोक्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mathura Labhan Cattle Breed : मराठवाड्यातील देखणा गोवंश ः मथुरा लभाण

Humani Control: १५ दिवसांत हुमणी करा गायब; हुमणी नियंत्रणाचे सोपे ३ मार्ग !

Pearl Farming : शिंपल्याच्या शेतीतून मोतीनिर्मिती

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटेंची अजित पवारांकडून खरडपट्टी; कृषिमंत्र्यांनी मागितली माफी

Silk Farming : रेशीम उद्योगाने वाचविली तोट्यातील शेती

SCROLL FOR NEXT