Na. Dho. Mahanor Agrowon
ॲग्रो विशेष

Indrajit Bhalerao : महानोरांच्या कवितेला सुगीचे दिवस

Article by Indrajit Bhalerao : पण आम्ही गेलो. जाण्यापूर्वी पांढरेंनी त्यांचे पळसखेडचे एक मित्र, जे महानोरांच्या कायम संपर्कात होते, गंगाधर सोहनी यांना फोन करून आम्ही येणार असल्याची कल्पना दिली.

Team Agrowon

इंद्रजित भालेराव

Na. Dho. Mahanor : पुढं जेव्हा २००० मध्ये पानझड या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तिथपासून पुन्हा एकदा महानोर प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांचे सत्कार आणि त्यांच्या लेखनावर चर्चासत्रे झडू लागली. प्रसिद्धिमाध्यमातून त्यांच्यावर पुन्हा लिहिलं जाऊ लागलं. मधल्या वाईट काळातून बाहेर पडून महानोरही पुन्हा फिरू लागले. कार्यक्रमाचा झपाटा पुन्हा सुरू झाला. पुन्हा एकदा महानोरांच्या कवितेला सुगीचे दिवस आले.

याच दरम्यान कधीतरी एकदा मी महानोरांच्या शेतावर जाऊन आलो. मी भुसावळला कुठल्यातरी कार्यक्रमासाठी गेलेलो होतो. परत येताना रवींद्र पांढरे या माझ्या आवडीच्या लेखक मित्राकडं पहुर या गावी गेलो. त्यांच्याशी छान गप्पाटप्पा झाल्या. जेवण करून गप्पा मारताना हाताशी भरपूर वेळ आहे म्हटल्यावर मी आपणाला पळसखेडला जाता येईल काय, असा विषय त्यांच्याकडं काढला.

ते म्हणाले, ‘‘हो बऱ्याच दिवसांपासून मीही गेलो नाही. मीही सोबत येतो.’’ महानोर तिथं असतील की नाही याची आम्हाला खात्री नव्हती. पण आम्ही गेलो. जाण्यापूर्वी पांढरेंनी त्यांचे पळसखेडचे एक मित्र, जे महानोरांच्या कायम संपर्कात होते, गंगाधर सोहनी यांना फोन करून आम्ही येणार असल्याची कल्पना दिली. हे सोहनी कवितेचे रसिक आणि माझ्या कवितेचे चाहतेच निघाले.

त्यांनी फार आत्मीयतेने आणि प्रेमाने आम्हाला सगळं फिरून दाखवलं. पुढं महानोरांची ‘तिची कहाणी’ आली आणि त्या कवितासंग्रहाच्या अर्पणपत्रिकेत गंगाधर सोहनी दिसले. नंतर असेही समजले, की सोहनी हे महानोरांच्या कुटुंबातलेच सदस्य समजले जातात. त्यांनी आम्हाला महानोरांचं घर, शेत, गावाचा परिसर, महानोर यांनी बांधलेलं बहिणाबाई चौधरी यांच्या नावाचं सभागृह असं सगळं नीट दाखवलं.

त्या वेळी महानोर शेतावर राहत नव्हते. शेतावर एवढा जीव असलेला हा माणूस कौटुंबिक संघर्षामुळं नाइलाजानं जळगावला जाऊन भाड्याच्या घरात राहत होता. शेतात आम्ही भरपूर फोटो काढले. नंतर या फोटोंचा मी एक स्वतंत्र अल्बम बनवून घेतला. त्याला ‘पळसखेडचे फोटो’ असेच नाव दिले. महानोरांचं शेतातलं घर बंदच होतं. शेतात कुणी माणसं नव्हती.

सगळं शेत फिरून आम्ही पाहिलं. रानपाखरांचा किलबिलाट तेवढा शेतात ऐकायला येत होता. महानोरांच्या शेतातल्या घराला कुलूप लावलेलं होतं. महानोर यांच्या घरचं कुणी सोबत येऊ शकलं नसल्यामुळं ते कुलूप काढून आत काय आहे ते पाहणं शक्य नव्हतं. समोर असलेल्या खिडकीतून आतली पुस्तकांची कपाटं दिसत होती. महानोर यांचा ग्रंथसंग्रह अजून शेतातच होता. त्यांनी सुरुवातीच्या काळात झपाटून वाचलेली मराठी वाङ्‍मयाची पुस्तक, ज्यांनी त्यांच्यावर संस्कार केले, जी पुस्तक त्यांनी हाताळली, ती एकदा पाहायची इच्छा होती.

पण कुलूप काढण्यासाठी किल्ल्या आमच्याजवळ नव्हत्या. घरून आमच्या सोबत येण्यासारखं कोणी माणूसही नव्हतं. कारण महानोर जळगावात राहत होते आणि या घराच्या किल्ल्याही त्यांच्यासोबतच होत्या. आम्ही महानोरांना कल्पना देऊन आलेलो नव्हतो. त्यामुळे अशी काही व्यवस्था त्यांनी करावी अशी अपेक्षाही नव्हती. घरासमोरच्या पडवीत टागोरांची कविता लावलेली होती. २०१२ ला झालेल्या टागोर जन्मशताब्दीच्या निमित्तानं कदाचित त्यांनी ती कविता लावलेली असावी. कारण त्या काळात त्यांनी ती कविता त्यांच्या लेटरपॅडवरही छापलेली होती. आणि अनेकांना स्वतंत्रपणे पाठवलेली पण होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT