Cotton Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Rate : कापसाचे दर सुधारण्याचे संकेत

Cotton Market : चांगल्या प्रतीच्या कापसाचे दर ७ हजारांवर राहण्याचा अंदाज

Team Agrowon

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News : नागपूर ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे बोंडातील कापसाची खालावलेली प्रत, बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे देशांतर्गत प्रक्रियेकामी चांगल्या कापसाची उपलब्धता कठीण वाटत आहे. त्याच्याच परिणामी फेब्रुवारीअखेर किंवा मार्चमध्ये कापसाच्या दरात सुधारणा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. कापसाचे दर या काळात ७ हजार रुपयांपेक्षा अधिक राहतील, असा विश्‍वास या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्‍त केला.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसल्याने बोंडातील कापूस भिजला. त्यामुळे कापसाची प्रत खालावण्याबरोबरच त्याचा रंगही बदलला. अशा कापसाला बाजारात दर मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रक्रियेकामी चांगल्या प्रतीच्या कापसाची मागणी राहते.

तसा कापूसच उपलब्ध होणार नसल्याने कापसाच्या दरात मार्चपर्यंत सुधारणा होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कापसाचा हमीभाव ७०२० रुपये असताना सध्या खुल्या बाजारात कापसाला ६००० ते ६८०० असा दर मिळत आहे. ओलावा अधिक असल्याचे कारण देत कापसाचे दर दबावात ठेवण्यात आले आहेत.

दुसरीकडे चांगल्या प्रतीच्या कापसाची उपलब्धता होत नसल्याने प्रक्रिया उद्योजकांची अडचण झाली आहे. परिणामी मार्चपर्यंत कापसाच्या दरात तेजी येईल, असा विश्‍वास या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. सध्या कापसाला प्रतिखंडीसाठी (३५६ किलो रई) ५५ हजार रुपयांचा दर मिळत आहे.

वायदे बाजारानुसार मार्चमध्ये कापसाचे प्रतिखंडी दर हे ६० हजार ४०० रुपयांवर जातील, अशी शक्‍यता आहे. कापसाच्या गाठीबरोबरच सरकीचे दरही सुधारण्याची शक्‍यता असल्याने कापसाच्या भावातही सुधारणा होण्याचा अंदाज आहे. कापसाचे भाव ७००० रुपयांच्या पुढे राहतील, असे कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. ७५०० रुपये क्‍विंटलचा पल्ला कापूस गाठेल, अशीही शक्‍यता आहे.

वायदे बाजारात मार्चमध्ये कापसाचे व्यवहार प्रतिखंडी ६० हजार ४०० रुपयांनी होत आहेत. त्यामुळेच कापूस दरात सुधारणेची शक्‍यता असून दर ७००० रुपयांपेक्षा अधिकच राहतील, असे संकेत आहेत.
- जयेश महाजन, नोडल अधिकारी, स्मार्ट कॉटन प्रकल्प.

चांगल्या प्रतीच्या कापसाची उपलब्धता नसल्याने सर्वच स्तरावर कापसाची मागणी वाढणार आहे. त्याचा परिणाम दरावर होईल. मार्चमध्ये सात हजार रुपयांच्या पुढे दर राहतील. सरकीच्या दरातही तेजी येणार असल्याचे चित्र आहे.

आता सरकीला २६०० ते २७०० रुपये क्‍विंटल तर प्रतिखंडी ५५ ते ५६ हजार रुपये दर आहेत. सध्या रोज सरासरी १० लाख क्‍विंटलची आवक आहे. फेब्रुवारीत आवक कमी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच दरातही सुधारणा होणार आहे.
- गोविंद वैराळे, कापूस विपणन विषयाचे अभ्यासक

असे आहे कापूस उत्पादनाचे चित्र
- देशात २९० लाख गाठी (१४०० लाख (१४ कोटी) क्‍विंटल कापूस)
- महाराष्ट्र ७५ ते ८० लाख गाठी (३७५ ते ३८० लाख क्‍विंटल कापूस)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT