Fog Prediction Agrowon
ॲग्रो विशेष

Fog Prediction: धुक्याच्या अचूक अंदाजाचे मॉडेल विकसित

Weather Technology: हिवाळ्यात विमान प्रवासात धुक्यामुळे होणारे धोके टाळण्यासाठी ‘एअरवाइज सिस्टिम मॉडेल’ विकसित करण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News: हिवाळ्यात विमान प्रवासात धुक्यामुळे होणारे धोके टाळण्यासाठी ‘एअरवाइज सिस्टिम मॉडेल’ विकसित करण्यात आले आहे. विंटर फॉग एक्स्पेरिमेन्ट (वायफेक्स) या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेले हे मॉडेल पुण्यातील भारतीय उष्णदेशीय मोसम विज्ञान संस्थेने (आयआयटीएम) विकसित केले आहे. यावर दहा वर्षांपासून काम करण्यात येत होते, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी दिली.

डॉ. रविचंद्रन यांच्या हस्ते मंगळवारी (ता.२२) पाषाण येथील ‘आयआयटीएम’ मधील वायुमंडलीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आयआयटीएमचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव, ‘वायफेएक्स’चे प्रकल्प संचालक डॉ. सचिन घुडे, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सल्लागार डॉ. कमलजित रे,  डॉ. व्ही. एस प्रसाद  आणि इतर अधिकारी, शास्त्रज्ञ आणि कर्मचारी उपस्थित होते. 

याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. रविचंद्रन म्हणाले, की उत्तर भारतात जास्त धुके असते. त्यामुळे विमान उड्डाणावेळी समस्या येतात. तसेच रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होतो. या मॉडेलमुळे धुके कशामुळे तयार होते, त्याची कारणे कोणती? त्यावर काय उपाय आहेत? कोणती उपकरणे वापरावी लागतील, याचा अभ्यास करून हे मॉडेल तयार करण्यात आले आहे. यामुळे ४८ तास अगोदर धुक्याचा अंदाज मिळणार आहे. 

‘‘वायफेक्स’ प्रकल्पांतर्गत हिवाळ्यातील धुक्याचा अभ्यास करण्यासाठी २०१५-१६ मध्ये दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध यंत्रे, सेन्सर्स बसवण्यात आले. त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे धुक्याचा अंदाज वर्तवण्यासाठी प्रारूप तयार करण्यात आले.

आता लवकरच मॉडेलचे सेन्सर्स ईशान्येकडील राज्यांमध्येही बसवले जाणार आहेत. गुवाहाटी, दिब्रुगड, इटानगर, दिवापूर आणि जोरहर किंवा तेजपूर या विमानतळांवर सेन्सर बसवले जातील,’’ असेही डॉ.रविचंद्रन यांनी सांगितले.

डोंगराळ भागासाठी स्वतंत्र प्रारूप

‘‘नोएडा, ईशान्य भारतातील काही विमानतळांवरही हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ईशान्य भारतातील धुक्याचा अधिक वेगळ्या प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे. तो डोंगराळ भाग असल्याने तेथील धुक्याचे स्वरूप वेगळे आहे.

गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर श्रीनगरमध्ये अभ्यास करण्यात आला. त्यातून डोंगराळ भागातील धुक्याचे स्वरूप वेगळे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे डोंगराळ भागासाठीचे स्वतंत्र प्रारूप विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे,’’ असे ‘वायफेएक्स’चे प्रकल्प संचालक डॉ. घुडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT