E Peek Survey Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : ‘ई-पीकपाहणी’साठी सर्व्हरची क्षमता वाढविली

Digital Agriculture Server Capacity : ई-पीकपाहणी करताना उद्‌भविणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील शेतकरी हैराण झालेले आहेत. दरम्यान, आता सर्व्हरची क्षमता वाढविल्यामुळे तांत्रिक दोष दूर झाल्याचा दावा शासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.

Team Agrowon

Pune News : ई-पीकपाहणी करताना उद्‌भविणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील शेतकरी हैराण झालेले आहेत. दरम्यान, आता सर्व्हरची क्षमता वाढविल्यामुळे तांत्रिक दोष दूर झाल्याचा दावा शासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.

खरीप हंगामाची ई-पीकपाहणी एक ऑगस्टपासून सुरू होत असल्याचे राज्य शासनाने घोषित केले. परंतु त्यासाठी लागणारी तांत्रिक पूर्वतयारी केली नाही. त्यामुळेच १० ते १२ ऑगस्टदरम्यान तीन दिवस पीकपाहणीचे काम बंद पडले. त्यामुळे राज्यभर गोंधळ उडाला. शेतकऱ्यांना या काळात भ्रमणध्वनीद्वारे ई-पीकपाहणी करता आली नाही. त्यासाठी दिलेले सरकारी उपयोजन (अॅप्लिकेशन) बंद पडले होते, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादकांना आर्थिक मदतीसाठी कृषी विभागाने ई-पीकपाहणी सक्तीची केली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महसूल विभागाच्या अनागोंदीमुळे पीकपाहणी करण्यात अडचणी आल्यास शेतकरी नाराज होतात. त्यातून ई-पीकपाहणीची अट काढून टाकण्याची मागणीदेखील होत असते, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की ई-पीकपाहणीत केवळ दोन दिवसांपुरता तांत्रिक दोष होता. तो आता हटविण्यात आल्या आहे. तसेच सर्व्हरची क्षमताही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभर ई-पीकपाहणी वेगात सुरू आहे. येत्या एक सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी करता येईल.

राज्यात सध्या दोन प्रकारची ई-पीकपाहणी सुरू आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या ई-पीकपाहणी ही डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) उपक्रमाचा भाग आहे. अर्थात, ही पाहणी केवळ ३५ तालुक्यांमधील २८०० गावांपुरती मर्यादित आहे. राज्यातील इतर ४१ हजारांहून अधिक गावांमध्ये राज्य शासनाची ई-पीकपाहणी स्वतंत्रपणे केली जात आहे. तांत्रिक दोष दूर झाल्यामुळे सध्या रोज एक ते दीड लाख शेतकरी ई-पीकपाहणी करीत आहेत, असा दावा महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्याची ई-पीकपाहणी एक ऑगस्टपासून सुरू आहे. तसेच केंद्र शासनाने पथदर्शक (पायलट) निवडलेल्या ३४ तालुक्यांमध्ये ‘डीसीएस’ पद्धतीची ई-पीकपाहणी सुरू आहे. मध्यंतरी पीकपाहणीच्या प्रमाणात एकदम वाढ झाली व सर्व्हरवर ताण आला. त्यामुळे शेतकरी वर्गाला अडचणी आल्या होत्या. डिजिटल संसाधने वाढवत आम्ही या अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे ई-पीकपाहणीच्या नोंदणीत रोज काही लाखाने वाढ झाली आहे.
सरिता नरके, प्रमुख, संगणकीय सातबारा प्रकल्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT