Edible Oil Prices agrowon
ॲग्रो विशेष

Edible Oil Rate : खाद्य तेलाच्या दरात वाढ; भाजीपाला मार्केटमध्ये कोथिंबीरीची रेलचेल, जाणून घ्या बाजारभाव

sandeep Shirguppe

Vegetable Market Kolhpur : ऐन सणासुदीत खाद्यतेलाच्या दरात वाढ करण्यात आला आहे, एका किलोमागे ५ ते १० रुपयांची वाढ करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. खाद्यतेलाच्या दरवाढीबरोबरच तेलाचा तुटवडाही जाणवत आहे. बाजारातील साठे कमी असल्यामुळे नागरिकांना तेलाच्या खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. सणासुदीत खरेदीत वाढ होत असताना खाद्यतेलाच्या किमतीत झालेली ही वाढ बाजारात महागाईची चिंता अधिकच वाढवणारी ठरत आहे.

गणपती आगमनावेळी फुलांना चांगली मागणी असल्याने दरही तेजीत होता परंतु घरगुती गणपती पडल्याने शेतकऱ्यांना कमी दरात फुले विकावी लागत आहेत. झेंडू भाव मात्र तसेच राहिल्याने चांगला दर मिळत आहे. आष्टर फुलांची नवीन आवक सुरू झाली आहे.

सणासुदीमुळे भाजीपाला बाजारात शांतता दिसून येत होती तसेच भाज्यांचे दरही जैसे थे राहिले आहेत. कोंथिबिरीचा दर तेजीत असल्याने पेंडी सोडून १० काड्या ५ ते १० रुपयांना असे विक्री होत आहे. फळभाज्यांचे भाव काही टिकून तर वांगी, दोडका, टोमॅटोचे भाव वाढत आहेत. गौरी विसर्जनामुळे अळूच्या पानांची चांगली विक्री झाली. सीताफळाची आवक सुरू झाली आहे. किवी, ड्रॅगनला मागणी चांगली आहे.

भाजीपाला : टोमॅटो २० ते २५, दोडका-६० ते ७०, वांगी-८० ते १००, कारली ४० ते ५०, ढोबळी मिरची- ३० ते ४०, मिरची ६० ते ७०, फ्लॉवर- ३० ते ४०, कोबी-२० ते ३०, बटाटा-४० ते ५०, कांदा ५५ ते ६०, लसूण- ३८० ते ४००, आले- १०० ते १२०, लिंबू-३०० ते ७०० शेकडा, गाजर ४० ते ५०, गवार - १०० ते १२०, भेंडी- ६० ते ८०, देशी काकडी ७० ते ८०, काटा काकडी ४० ते ५०, दुधी ३० ते ४०, कोथिंबीर ५० ते ६०, पालक, मेथी २५ ते ३०, अन्य भाज्या २० ते २५ पेंडी, शेवगा ५ ते ७ रुपये नग.

फुले : झेंडू १८० ते २००, निशिगंध ४५० ते ५००, गुलाब ३५०, गलांडा - १५० ते १८०, शेवंती - १८० ते २००, आष्टर - २०० ते २५०.

फळे: सफरचंद २२० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी - ८० ते १००, डाळिंब २०० ते २५०, चिकू- १०० ते १२०, पेरू-५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ६० ते १००, मोर आवळा -१२० ते २००, सीताफळ १५० ते २००, कलिंगड ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी- १०० ते १२० डझन, किवी- १६०, ड्रॅगन १५० ते २००, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०.

खाद्यतेल : सरकी- १२५ ते १३०, शेंगतेल १८२ ते १८८, सोयाबीन- ११५ ते १२०, पामतेल - ११५ ते १२०, सूर्यफूल - १२० ते १२५.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बाशीं शाळू ३० ते ५३, गहू ३३ ते ४२, हरभराडाळ ९५ ते ९७, तूरडाळ- १५५ ते १६५, मूगडाळ -११० ते ११५, मसूरडाळ- ७८ ते ८२, उडीदडाळ १३० ते १४०, हरभरा- ९०, मूग १०० ते ११०, मटकी- १०५ ते ११५, मसूर-७० ते ७५, फुटाणाडाळ - ११० ते १५५, चवळी- १०० ते १३०, हिरवा वाटाणा १७५, छोला -१२० ते १५०.

नारळाची उलाढाल वाढली

गणेशोत्सवात शहरात नारळाच्या मागणीत दुप्पट वाढ झाली आहे. बाजारात कर्नाटक, तमिळनाडूतून नारळाची मोठी आवक झाली. पूजेसह तोरणासाठी लागणाऱ्या नारळाला अधिक मागणी आहे. शेंडी, कुमठा नारळाच्या दरात किरकोळ वाढ झाली. अनंत चतुर्दशीपर्यंत शहरात नारळाची मोठी उलाढाल होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Development : मराठवाड्याची कालबद्ध प्रगती हेच ध्येय्य

Agriculture Management Techniques : हवामान बदल अनुकूल शेती व्यवस्थापन तंत्र

Soybean Guaranteed Price : मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा मुद्दा चिघळला? शेतकरी ६ हजारांवर ठाम, संयुक्त किसान मोर्चा महामार्ग रोखणार

Proso Millet : आरोग्यदायी पौष्टिक भगर

Poultry Farming: कोंबड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक

SCROLL FOR NEXT