Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : नगरला टॅंकरच्या संख्येत वाढ

Water Scarcity : नगर जिल्ह्यतील अनेक भागात आता टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. त्यामुळे टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठीच्या गावांची संख्या वाढली आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यतील अनेक भागात आता टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. त्यामुळे टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठीच्या गावांची संख्या वाढली आहे. ८३ टॅंकरने जिल्ह्यातील ८५ गावे व ४४२ वाडी वस्तीवरील १ लाख ७० हजार ७११ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे.

नगर जिल्ह्यात या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पाथर्डी, संगमनेर तालुक्यांतील पठारी भागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करावा या मागणीत वाढ होऊ लागली असल्याने टॅंकरची संख्याही वाढत आहे.

सध्या पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक गावे टंचाईग्रस्त आहेत. पाथर्डीमध्ये २८ गावे १५५ वाड्यांमधील ५५ हजार ९३६ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. कर्जतमधील १६ गावे १०५ वाड्यांमधील ३७ हजार ८११ लोकसंख्येला पाणी पुरवठा केला जात आहे.

संगमनेर १४ गावे ३६ वाड्यांमधील २० हजार ८४ लोकसंख्या, नगर ११ गावे ३० वाड्यांमधील १८ हजार ६७८ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. पारनेर ४ गावे २४ वाड्यांमधील ७ हजार ३५ लोकसंख्या, जामखेड ७ गावे ३२ वाड्यांमधील १७ हजार ४९९ लोकसंख्या, श्रीगोंदेमधील ३ गावे ३२ वाड्यांमधील ९ हजार ७८४ लोकसंख्या,

अकोले तालुक्यातील एक गाव आणि ३ वाड्यांमधील १ हजार ६० लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक भागात गाव तलाव, पाझर तलावांसह विहिरी, विंधन विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. यंदा दर वर्षीच्या तुलनेत तीव्र टंचाईला समोरे जावे लागणार असल्याचे दिसून येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT