Koyna Dam agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : ‘कोयना’,‘वारणा’तून विसर्गात वाढ, कृष्णा नदीकाठच्या गावांना इशारा

sandeep Shirguppe

Koyna Dam Satara : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळे कोयना धरणातून काल(ता.२७) विसर्ग वाढवण्यात आला. सायंकाळी चारपासून १० हजार क्युसेक विसर्ग वाढवला असून, तो आता एकूण १२ हजार १०० क्युसेक इतका झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळी आज (ता.२८) वाढ होणार आहे. चांदोली धरणक्षेत्रात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने वारणा धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

कोयना धरणातील पाणीसाठा सध्या ९९.६३ टक्के इतका आहे. धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे. धरणक्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांत चांगला पाऊस झाला आहे. धरण भरण्याचा वेग वाढतो आहे. अशावेळी धरण पूर्ण भरले आणि पाऊस सुरू राहिला तर अडचण येऊ शकते. त्यामुळे आता धरणातून पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करण्यात आले. आधी २ हजार १०० क्युसेक इतका विसर्ग विद्युत निर्मितीसाठी केला जात होता. त्यात आता १० हजारांनी वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, चांदोली धरणातून १ हजार ४३५ क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यात २४३० क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण विसर्ग ३ हजार ८६५ क्युसेक इतका झाला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

कृष्णा नदीत २२ फूट पातळी

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसांत वेगाने वाढ झाली आहे. दहा फुटांपेक्षा कमी असलेली पातळी आज २३.७ फुटांवर पोहोचली होती. त्यात आणखी वाढ होणार आहे. पाणी पातळी २५ फुटांपेक्षा जास्त जाऊ शकते, असे सांगण्यात आले.

काळम्मावाडी धरणांतूनही विसर्ग सुरू

काळम्मावाडी धरण क्षेत्रामध्ये गेल्या २४ तासांत ११५ मिलिमीटर इतका पाऊस झाल्याने या धरणाचे वक्राकार दरवाजे आणखी १० सेंटीमीटरने उचलावे लागले. काल २५ सेंटीमीटर उघडलेले हे दरवाजे आज ३५ सेंटीमीटरपर्यंत आणखी उचलल्याने २००० क्युसेकने विसर्गात वाढ झाली आहे. दरवाजातून ४००० आणि पायथ्याच्या वीजगृहातून १००० असा ५००० क्युसेकने विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT